Home » गुन्हा » वारजे पोलिसांची गुन्हेगारीविरुद्ध जोरदार मोहीम — चार महिन्यांत ८ कुख्यात गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कारवाई

वारजे पोलिसांची गुन्हेगारीविरुद्ध जोरदार मोहीम — चार महिन्यांत ८ कुख्यात गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
260 Views
  • वारजे पोलिसांनी चार महिन्यांत ८ गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. अंतर्गत केले स्थानबद्ध .
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या नेतृत्वात नियमित पेट्रोलिंग आणि तपासातून परिसरातील गुन्हेगारीवर ठेवले नियंत्रण .
  • पुढेही गुन्हेगारांवर कठोर कारवाई राहणार सुरू .
पुणे शहर पोलीस दलातील वारजे पोलीसांनी मागील चार महिन्यांत एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत ०८ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हेगारी वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विश्वजीत काईगडे यांनी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष टीम तयार केली. या टीममध्ये पोलिस उप-निरीक्षक मनोज साळुंखे, पोलीस अंमलदार किरण तळेकर, विजय खिलारी यांचा समावेश आहे. त्यांनी रामनगर, गोकुळनगर, म्हाडा वसाहत आणि कर्वेगनर अशा परिसरात दररोज फुट पेट्रोलिंग राबवले. विशेषतः सायंकाळी ६ ते ८ वाजता कॉलनी भागांमध्ये पेट्रोलिंग वाढवले गेले.
या पेट्रोलिंगमुळे अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवले गेले. अशा गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून ते पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले. या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यानंतर ओंकार उर्फ टेडचा उमेश सातपुते, गौरव संजय शेळके, गणेश उर्फ गुडचा अनिल पटेकर, ओंकार उर्फ देण्या सुधाकर चौधरी, यश विजय साष्टे, अभिषेक शरद सोनवणे, नितीन उर्फ पप्पू लक्ष्मण पद्माकर यांना विविध कारागृहांमध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
याशिवाय पियुष उर्फ कान्हा सतिश जाधव यालाही स्थानबद्ध करण्याचा आदेश झाला असून, वारजे जकात नाका परिसरातून त्याला ताब्यात घेतले आणि छत्रपती संभाजी नगर कारागृहात स्थानबद्ध केले.
या सर्व कारवाया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे आणि तपास पथकाच्या पोलिस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस हवालदार संजीव कळंबे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, सागर कुंभार, योगेश वाघ, निखील तांगडे, शरद पोळ, अमित शेलार, गणेश शिंदे आणि ज्ञानेश्वर चित्ते यांचा पथकाने पार पाडली.. सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस उप-निरीक्षक मनोज साळुंखे, पोलीस अंमलदार किरण तळेकर, विजय खिलारी आणि विजय भुरुक यांनी गुन्हेगारीवर नजर ठेवली आहे.
वारजे पोलीस ठाण्याच्या या कडक कारवाईमुळे परिसरातील शांतता पुन्हा प्रस्थापित झाली असून गुन्हेगारीची वाढ थांबविण्यात यश आले आहे. या यशामागे पोलिसांची सातत्याने वाढलेली गस्त, सतर्कता आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करणाऱ्या सर्व अधिकार्‍यांचा मोठा वाटा आहे. पुढील काळातही या पोलिस दलाने गुन्हेगारी नियंत्रणासाठी कडक पावले उचलण्याचा संकल्प व्यक्त केला आहे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा निर्धार दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!