पुणे शहर व जिल्ह्यात अग्रणी ठरलेल्या नांदेड – जेपी नगर येथील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक व किरकटवाडीचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब अर्जुनराव हगवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पतसंस्थेच्या निवडणुकीत रामेश्वर पॅनेलने निळकंठेश्वर पॅनेलचा दारुण पराभव करत सर्व १३ जागा जिंकल्या. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सहकार खात्याचे सहायक अधिकारी संतोष शिंगाडे यांनी पाहिले. सचिन दशरथ दागंट यांची उपाध्यक्षपदीही बिनविरोध निवड झाली.
नवीन अध्यक्ष बाळासाहेब हगवणे म्हणाले की, “सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता संस्था पारदर्शकपणे चालवणार आहोत. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या संस्थेचा ठेवींचा आकडा लवकरच २०० कोटींवर नेण्याचा मानस आहे. ठेवीदार व कर्जदारांच्या हितासाठी नवे उपक्रम राबवले जातील.”
या वेळी पतसंस्थेचे संचालक विकास दांगट, विलास मते, बाळासाहेब घुले, अभिजित घुले, राजेंद्र हगवणे, देवीदास एकनाथ लगड, राजेश देवकर, विनादेवी मते, मनिषा मोरे, विकास कोल्हे, नागेश सोपान शिंदे आदी उपस्थित होते.