Home » गुन्हा » वाघोलीत गांजा विक्री प्रकरणी एकजण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी

वाघोलीत गांजा विक्री प्रकरणी एकजण ताब्यात; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी

Facebook
Twitter
WhatsApp
93 Views

वाघोली, पुणे :

गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने वाघोली परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेण्याची कारवाई करत १२,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे व नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाघेश्वरनगर, गोरे वस्ती रोड, वाघोली येथे विकास उर्फ बाळ्या हा गांजाची विक्री करत आहे.पथकाने तत्काळ सापळा रचून संशयित विकास उर्फ बाळ्या नागनाथ कांबळे (वय २३ वर्षे, रा. वाघेश्वरनगर, वाघोली, पुणे) यास ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडून १४० ग्रॅम वजनाच्या गांजाच्या पुड्या आणि एक मोबाईल असा एकूण १२,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्राथमिक चौकशीत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक तपास केला असता त्याने मुद्देमाल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.सदर आरोपीस पुढील तपासासाठी वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे)  निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2)  राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, अंमलदार ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!