रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारा सोनेरी दिवस
शिवणे – सालाबाद प्रमाणे याही वर्षी सहा जून रोजी 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ लोकसेवक श्री अतुल दिगंबर दांगट पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी मा. उपसभापती शेखर भाऊ दांगट पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करत मानदंडाचे पूजन करून छत्रपतीना वंदन करत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यंदा शिबिराचे हे तेरावे वर्ष होते…
यावेळी शिवणे उत्तम नगर कोंढवे कोपरे, नांदेड या पंचक्रोशीतील युवकांनी सहभाग नोंदवला सुमारे 400 नागरिकांनी रक्तदान करत आपली शिवभक्ती ही व्यक्त केली यावेळी प्रत्येक रक्तदात्याला स्वामींची मूर्ती श्री अतुल भाऊ दिगंबर दांगट व मित्र परिवारातर्फे भेट स्वरूपात देण्यात आले या शिबिराचे व्यवस्थापन भारती ब्लड बँक व महा ब्लड बँक यांनी केले होते.
या शिवराज्याभिषेकादिनी हभप मां. सभापती शुक्राचार्य वांजळे, भाजपा नेते अरुण भाऊ दांगट छावा संघटनेचे प्रवक्ते गणेश राऊत, राष्ट्रवादीचे नेते त्रिंबक अण्णा मोकाशी सुरेश आण्णा गुजर बाबा शेठ धुमाळ सौ.अनिता ताई इंगळे भगवान शेठ गायकवाड संदीप आप्पा देशमुख कीर्तनकार संदीप महाराज गोगावले कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे दिलीप भाऊ कदम प्रशांत लांडगे सिद्धार्थ कदम अंबादास धर्म कांबळे राहुल दांगट संजय दांगट अमर दुधाने रघुनाथ दांगट प्रशांत महाजन व सर्व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते…
सर्वांनी या राज्याभिषेक दिनी रक्तदान सोहळ्यास व रक्तदान करण्यास ज्या नागरिकांनी साथ दिली त्या सर्व मावळ्यांचे मनस्वी आभार आयोजक अतुलभाऊ दिगंबर दांगट पाटील यांनी मानले ..