Home » ब्लॉग » डॉ. पवन सोनवणे : डॉक्टरकीतून राजकारणात प्रवेशाची तयारी

डॉ. पवन सोनवणे : डॉक्टरकीतून राजकारणात प्रवेशाची तयारी

Facebook
Twitter
WhatsApp
408 Views
वाघोली – वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वाघोली येथील युवा डॉक्टर डॉ. पवन सोनवणे यांचं नाव सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. वाघोली भागातून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या तयारीची जोरदार चर्चा असून, अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या प्रभागातून ते निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. सोनवणे हे उच्चशिक्षित, तरुण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक कार्यातही भरीव सहभाग नोंदवला आहे. विविध आरोग्य शिबिरे, मोफत तपासण्या, आणि लोकजागृती उपक्रमांद्वारे त्यांनी आपली मजबूत सामाजिक छाप निर्माण केली आहे.
डॉक्टर संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवले असून, डॉक्टर्समध्येही त्यांना विश्वासार्ह नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला डॉक्टर्स आणि समाजसेवक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
विशेष म्हणजे, ते माजी मंत्री एकनाथ खडसे कुटुंबियांचे जवळचे सहकारी मानले जातात, तसेच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांतील अनेक नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने, राजकीय पातळीवरही त्यांना व्यापक पाठबळ मिळू शकते.
सध्या डॉ. सोनवणे हे विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधत असून, जनसंपर्क मोहिमेला प्रारंभ केला आहे. एक अभ्यासू, सुसंस्कृत आणि नव्या विचारांचा चेहरा म्हणून स्थानिक नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
लवकरच ते अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा करतील, अशी शक्यता असून, त्यांच्या प्रवेशामुळे वाघोलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय हालचाल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!