वारकरी भावीकांसोबत योगा व त्यांना अत्यावश्यक साहीत्याचे वाटपासह

वारजे : प्रतिनिधी
पालखी सोहळ्यानिमित्त वारजेतील
रेणुका नगर मुक्कामी असलेल्या तालुका आंबेजोगाई माकेगाव येथील एकमुखी श्री दत्त मंदिर देवस्थान दिंडीतील वारकरी भावीकांना वारजे हायवे परीसर विकास प्रतिष्ठान आणि माजी विरोधीनेत्या दिपाली धुमाळ यांच्या मार्फत संपूर्ण एक महिना पुरेल एवढे आवश्यक असणारे औषधे त्याच बरोबर जास्त दिवस टिकेल असे साहित्य खाद्य पदार्थ देण्यात आले. तसेच दोन दिवस वारजे येथे मुक्कामी आल्यानंतर वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, चहा, नाष्टा, आदींची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जागतीक योग दिनानिमित्त वारकर्यांसमवेत योगा वर्ग घेण्यात आला. राजमाता योग वर्गाच्या प्रमुख योग शिक्षिका मिना गावडे, योग साधक यांनी यावेळी योगा वर्ग घेतले. यासाठी माजी नगरसेवक प्रदिप धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड, डॉ. गणेश फडणीस, राजेश गायकवाड, अरूण पाटील, संदेश कोंडे, व पालीकेचे सफाई कर्मचारी व सभासदांचे सहकार्य लाभले
फोटो ओळ : वारजे माळवाडी येथे दिंडीतील वारकऱ्यांना अत्यावश्यक साहीत्याचे वाटप करण्यात आल