पुणे : प्रतिनिधी
पुण्यनगरीत माऊलींच्या पालखीचे आगमन नुकतेच होऊन गेले. त्या निमित्त समाजवादी पार्टी पुणे च्या वतीने माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच वारीत आलेल्या वारकरी भक्तांसाठी अल्पोपहार म्हणून राजगिरा लाडू, भेळ आणि केळी या खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. नाना पेठ भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव (लक्ष्मण) दिवेकर यांच्या हस्ते वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव अनिस अहमद, एस. एम. जोशी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश दिवेकर, आदी उपस्थित होते. प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक गायकवाड, पुणे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ पाकिरे, खडकवासला विधानसभा मतदार संघ अध्यक्ष वसंतराव कोळी, पुणे शहर संघटक प्रकाश डोंबाले, यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण लांबे यांनी केले होते.