किमया आश्रमात यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अद्वितीय अश्या आध्यात्मिक वातावरणात पार पडला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, साधकांनी गुरुपाद्य पूजन करत आपली श्रद्धा व्यक्त केली आणि १००० हून अधिक साधकांनी सहभाग घेतला. त्यानंतर स्वामी कृष्ण चैतन्य यांच्याकडून अनेकांना गुरुदीक्षा प्रदान करण्यात आली. जागृत गुरूंचे मार्गदर्शन आणि दीक्षा मिळाल्याने साधकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकले; भक्तीभावाने भाविक ते क्षण अनुभवन भावनिक झाले होते .
स्वामीजी हे ISRO-DRDO चे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तसेच किमया गुरुगादीचे १३३७ वे पिठाधीश आहेत.
या उत्सवाची सुरुवात ३ जुलैपासून ‘गुरुपर्व’ या विशेष काळाने झाली होती, ज्यामध्ये अनेक प्राचीन विधी व शक्तिप्रद पूजांचा समावेश होता. गुरु सदाशिव महापूजा, नाग बंधन मुक्ति पूजा, हनुमान महापूजन, बगलामुखी पूजन, आणि अनेक जटिल यंत्र पूजा या काळात साधकांच्या साक्षीने पार पडल्या.
तसेच, ७ ते ९ जुलैदरम्यान, तीन दिवस चाललेल्या प्रक्रियेत ५८ साधकांना संन्यास दीक्षा प्रदान करण्यात आली – जो गुरुपर्वातील एक विशेष आध्यात्मिक टप्पा ठरला.
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर सात्विक महाप्रसाद, तसेच साधकांनी अनंतलोकातील नागराज वासुकी यांच्या सान्निध्यात असलेल्या शांत ध्यानाची जागा अनुभवली आणि भक्तिस्थळातील भक्तिमय आनंदाचा आस्वाद घेतला.
अंतःशांतीचा अनुभव घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाने, पुण्याजवळील चांदे (मुळशी) येथील निसर्गसंपन्न किमया आश्रमाला एकदा तरी अवश्य भेट द्यावी.