दरोडा व घातक शस्त्र च्या गुन्हयामधील आरोपी अटक , एक गावठी पिस्टल जप्त, गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई
सार्वभौम न्युज समूह
वारजे (प्रतिनिधी ) : दिनांक ०६/०८/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ०३ कडील स्टाफ सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस हवा. अमोल काटकर, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, महेंद्र तुपर्सीदर, पोलीस शिपाई, योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून कारवाई करणेकरीता वारजे पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत वारजे पुलाजवळ आलो असताना सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पो.हवा अमोल काटकर, पो शि तुषार किंद्रे यांना त्यांच्या बातमीदारमार्फत माहीती प्राप्त झाली की, इसम नामे महादेव श्रीकांत झाडे हा बारटक्के हॉस्पीटल जवळ, वारजे अतुलनगर रोड पुणे येथे आला असून त्याचेकडे पिस्टल आहे. त्याने अंगात काळया रंगाचा फुल बाहयाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बारटक्के हॉस्पीटल, अतुलनगर परीसर, वारजे पुणे येथे जावुन गुन्हे शाखा युनिट ०३ च्या पथकातील सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस हवा. अमोल काटकर, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, महेंद्र तुपसौंदर पोलीस शिपाई, योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंग्रे असे जावुन नमुद इसमाचा शोध घेता बातमीतील वर्णनाचा इसम हा बारटक्के हॉस्पीटल समोर, अतुलनगर, वारजे, पुणे येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेवून आमची ओळख सांगून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महादेव श्रीकांत झाडे वय २० वर्ष रा. अतुलनगर, वारजे माळवाडी, पुणे असे असल्याचे सागितल्याने दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेच्या उजव्या बाजुला एक लोखंडी पिस्टल मिळून आले. सदरचे पिस्टल पंचासमक्ष पंचनाम्याने जप्त करुन त्यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा, युनिट ०३ च्या कोथरुड येथील कार्यालयास घेवुन येवुन सपोनि ढवळे यांनी त्याच्याकडे मिळुन आलेल्या पिस्टलबाबत चौकशी केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. तसेच ते कोठून आणले याबाबत विचारणा केली असता, त्याबाबत त्याने काहीही माहिती दिली नाही. त्यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी वारजे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही मा.श्री. पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) पुणे शहर, मा.श्री निखिल पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर मा. श्री. राजेंद्र मुळीक, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार भाऊसाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस हवा अमोल काटकर, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, महेंद्र तुपसौंदर, अतुल साठे, पोलीस शिपाई, योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे, अक्षय गायकवाड यांनी कामगिरी केलेली आहे.