Home » ब्लॉग » “महामार्ग नव्हे तर महाभयंकर मार्ग!” – अजितदादा पवारांना त्रस्त नागरिकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

“महामार्ग नव्हे तर महाभयंकर मार्ग!” – अजितदादा पवारांना त्रस्त नागरिकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Facebook
Twitter
WhatsApp
565 Views
“शिरूर-पुणे महामार्ग आज केवळ ‘महामार्ग’ उरलेला नाही, तर तो ‘महाभयंकर मार्ग’ बनला आहे,” अशा ठाम शब्दांत एका त्रस्त नागरिकाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांना उद्देशून लिहिलेलं एक भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या पत्रात संबंधित नागरिकाने महामार्गावरील वाढती वाहतूक, मोठमोठे खड्डे, अपूर्ण नियोजन आणि नागरिकांच्या जिवाला होणारा धोका अधोरेखित केला आहे. “आपण या महामार्गाची घोषणा मागील अर्थसंकल्पात केली होती, मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नाही,” असा थेट सवाल पत्रातून विचारण्यात आला आहे.

विशेषतः नियोजित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यायी मार्गांची व्यवस्था न झाल्यास वाहतूक पूर्ण ठप्प होईल, शेकडो अपघात आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होईल, याची जाणीवही या पत्रात करून देण्यात आली आहे.

पत्रात पुढे म्हटलं आहे की, शिरूर ते शिक्रापूर सहा लेन, न्हावरा-तळेगाव, पेरणे फाटा, वाडेबोल्हाईमार्गे वाघोली बायपास हे पर्यायी मार्ग पूर्णतः निष्क्रिय आहेत. रांजणगाव एमआयडीसीमधील हजारो कामगार, वाहनचालक, रुग्णवाहिका सेवा याच मार्गावर अवलंबून असल्याने नियोजनाअभावी जनतेचे हाल अपरिहार्य ठरू शकतात.
“हे केवळ रस्त्याचे नव्हे, तर जनतेच्या जिविताचे प्रश्न आहेत,” अशी ठाम भूमिका मांडत, दादांनी आपल्या ‘पालक’ या भूमिकेचं खऱ्या अर्थाने पालन करावं, अशी विनवणी नागरिकाने केली आहे.
हे पत्र सध्या सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्म्सवर वेगाने शेअर होत असून, “दादांना दाखवा हे पत्र”, “आमचा रस्ता सुधारावा”, अशा हॅशटॅगसह अनेकांनी या निवेदनाला जोरदार पाठिंबा दिला आहे. आता पालकमंत्री अजित पवार याकडे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पत्रात नेमकं काय उल्लेख केलं आहे?
“महामार्ग” नव्हे, तर “महाभयंकर मार्ग” – रस्त्यावरील खड्डे, वाहतूककोंडी, नियोजनाचा अभाव यामुळे नागरिक हैराण.
उड्डाणपूलाचे काम सुरू होण्याआधी पर्यायी मार्गांची तयारी आवश्यक – शिरूर ते शिक्रापूर, न्हावरा-तळेगाव, वाडेबोल्हाई मार्गे वाघोली बायपास आदी मार्गांवर कोणतेही काम अद्याप सुरू नाही.
रांजणगाव एमआयडीसीतील हजारो कामगारांचा जीव धोक्यात – अडथळे, अपघात, खोळंबलेली रुग्णवाहिका सेवा यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
घोषणाच नाही, कृती हवी! – मागील अर्थसंकल्पात घोषणा झाल्यावरही प्रत्यक्ष कामाची अद्याप सुरुवात नाही, असा सवालही या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.
दादांप्रती भावनिक साद:
पत्राच्या शेवटी लेखक म्हणतो – “आपण आपल्या पालक या भूमिकेचं खऱ्या अर्थाने पालन कराल, हीच आमची कळकळीची विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!