Home » महाराष्ट्र » सिंहगडावर जाण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य

सिंहगडावर जाण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य 

Facebook
Twitter
WhatsApp
291 Views

सिंहगडावर जाण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य 

सार्वभौम न्युज समूह

पुणे : सिंहगडावर जाण्याची योजना आखणाऱ्या पर्यटकांसाठी आता नवा नियम लागू झाला आहे. ‘किल्ले सिंहगड’ या मोबाइल ॲपद्वारे पूर्वनोंदणी केल्याशिवाय गडावर प्रवेश मिळणार नाही. राज्यातील हा पहिलाच किल्ला आहे, जिथे ॲपद्वारे नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

 

वन विभागाने ही योजना प्रायोगिक स्वरूपात सुरू केली असून, काही दिवसांनंतर ती बंधनकारक केली जाईल. वाढत्या पर्यटक संख्येमुळे सुट्टीच्या दिवशी घाट रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांत पावसाळ्यात अचानक लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असल्याने दरड कोसळणे, अडकणे अशा घटनाही घडल्या होत्या.

 

‘किल्ले सिंहगड’ ॲपमधून पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगसोबतच गडाची ऐतिहासिक माहिती, वनसंपदा व वन्यजीवांविषयी माहिती, आपत्कालीन अलर्ट, वणव्याची माहिती आणि पार्किंग सुविधा यांसारख्या सोयी उपलब्ध होणार आहेत. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, आयफोन वापरकर्त्यांसाठीही लवकरच ते उपलब्ध होणार आहे.

 

वन विभागाने प्रतिदिन गडावर जाणाऱ्या पर्यटकांची प्रवेश मर्यादाही जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांच्या मते, हे ॲप पर्यटक आणि वनाधिकारी दोघांसाठीही उपयुक्त ठरणार असून, गर्दी वाढल्यास तत्काळ प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेता येईल.

 

#सिंहगड # किल्लेसिंहगड #ऑनलाइननोंदणी #पुणे #वनविभाग #पर्यटन

 

#Sinhagad #KilleSinhagad #OnlineRegistration #Pune #Forest Department #Tourism less

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!