पुणे (प्रतिनिधी) : कमिन्स इंडिया लिमिटेड, कोथरूड येथील कामगार भूषण राजेंद्र वाघ यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त राजभवन, पुणे येथे आयोजित स्वागत समारंभात अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. औद्योगिक क्षेत्रात तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने त्यांना कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.याची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी कवी राजेंद्र वाघ यांनी राज्यपाल महोदयांना ” श्रमिकांचं गोंदण “हा काव्यसंग्रह सप्रेम भेट दिला.
राजेंद्र वाघ यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे जीवन, मशाल, निर्भय आणि श्रमिकांचं गोंदण इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यांच्या साहित्यकृतीला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलने आयोजित करण्यात त्यांचा विशेष सहभाग असतो.
15 ऑगस्ट रोजी कमिन्स इंडिया लिमिटेड कोथरूड येथे ध्वजारोहण प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला .