कोकणात धुवाधार पाऊस, तरी सुद्धा किल्ले विजयदुर्ग येथील साफ सफाई मोहिम यशस्वीरीत्य पुर्ण
सार्वभौम न्युज समूह
प्रतिनिधी : गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने दिनांक १८\०८\२०२५ सोमवार या दिवशी किल्ले विजयदुर्ग येथे साफसफाई मोहिम संपन्न झाली. छत्रपती शिवरायांचा जय घोष करून सकाळी १० वा मोहिमेची सुरवात करण्यात आली. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, श्री हनुमान मंदिर, श्री भवानी माता मंदिर, तसेच किल्ल्यावरील सर्व भागातील प्लास्टिक कचरा, रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स गोळा करून कचरा उचलण्यात आला. या मोहिमेचे विशेष सांगायचे म्हणले तर मा. आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून १८ ऑगस्ट दिवशी किल्ले विजयदुर्ग वरती हेलियम डे साजरा केला जातो. हा योगायोग संस्थेच्या दुर्गसौनिकांना या मोहिमेच्या दिवशी अनुभवता आला. हेलियम डे निमित्त ग्रामस्थांकडून तसेच खगोल क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्या माध्यमातून एसटी डेपो ते किल्ले विजयदुर्ग या मार्गाने रॅली काढण्यात आली. व किल्ल्यावरील सायबाचा ओटा या ठिकाणी हेलियम डे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या रॅली मध्ये संस्थेचे दुर्ग सौनिक सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये संपर्क प्रमुख अभिजीत तिलोटकर , समन्वयक – यशपाल जैतापकर, सौरभ मनचेकर ,समीर गुरव अनिरुद्ध तीलोटकर,गौरव मणचेकर ,अभिषेक गुरव, रामदास घारकर,रोहित गुरव, दुर्गेश गुरव, प्रशांत गुरव, प्रथमेश कोळसूमकर,गौरी मणचेकर,तसेच विजयदुर्ग ग्राम विकास मंडळ चे पदाधिकारी सदस्य हे देखील सहभागी झाले होते.कार्यक्रमा प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.