गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना वाहतूकीस बंदी – आयुक्त
पुणे शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून व रस्त्यांवरून धावणा-या जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून त्यांचे जिवीतास धोका होवू नये तसेच पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने गरजेचे आहे, त्याअर्थी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/सीआर-३७/टिआरए-२, दिनांक-२७/०९/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५,११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन हिंमत जाधव, पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेशदेखावे वाहतूक करणारी वाहने इ.) खेरीज खालीलप्रमाणे आदेश दिलेले आहेत .
दिनांक २५.०८.२०२५ रोजी पासून ते ०७.०९.२०२५ पर्यत गणपती विसर्जना पर्यंत खालील नमुद रस्त्यांवर जड / अवजड वाहनांचे वाहतूकीस २४ तास बंदी करण्यात येत आहे.
१) शास्त्री रोड सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक
२) टिळक रोड जेधे चौक ते अलका चौक
३) कुमठेकर रोड शनिपार ते अलका चौक
४) लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका चौक
५) केळकर रोड फुटका बुरुज ते अलका चौक
६) बाजीराव रोड पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
७) शिवाजी रोड गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
८) कर्वे रोड नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
९) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक
१०) जंगली महाराज रोड स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
तरी वरील प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे