Home » ताज्या बातम्या » जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता वाढली

जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता वाढली

Facebook
Twitter
WhatsApp
229 Views

 

जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता वाढली

सार्वभौम न्युज समूह

प्रतिनिधी : आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहे, पण मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हाय कोर्टानं नकार दिला आहे.

परंतु जरांगे पाटील हे आझाद मैदान येथेच आंदोलन करण्यावर ठाम आहे . हाय कोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची भेट घेतली आहे. शिष्टमंडळानं अर्धा तास प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पुढील दीड तासांमध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा शिष्टमंडळाच्या वकिलांकडून करण्यात येत आहे.

आता नवीन अर्ज जो केला आहे, त्या संदर्भात प्रशासन विचार करत आहे. काही वेळात परवानगी मिळेल, अर्धा ते एक तासात ही परवानगी मिळणार आहे. नवीन नियमावली काल आली आणि त्याप्रमाणे ती न्यायालयात मांडली . त्याच पद्धतीने आम्ही अर्ज केला .

सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि चांगली बातमी  तासांतच मिळेल याची अपेक्षा करतो, असं शिष्टमंडळाच्या वकिलांनी म्हटलं आहे.

त्या ज्या अटी शर्ती सांगितलेल्या होत्या त्या संदर्भात चर्चा झाली, कालच्या सुनावणीत जरांगे पाटील  नव्हते . त्यांचं म्हणणं सादर करण्याची संधी देखील मिळाली नाही. ती संधी न मिळाल्यामुळे या गोष्टी झाल्या. मैदानाची वेळ पाळणे व इतर गोष्टी ज्या आहेत, आमरण उपोषणसह आंदोलनासंदर्भातील सर्वबांबीसाठी आम्ही अर्ज केला आहे, असंही ते यावेळी म्हणाले, त्यामुळे आता जरांगे यांचं आंदोलन आझाद मैदानावर होण्याची शक्यता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!