Home » राजकारण » पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी घेतली अखिलेश यादव यांची दिल्ली येथे भेट

पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी घेतली अखिलेश यादव यांची दिल्ली येथे भेट

Facebook
Twitter
WhatsApp
249 Views

पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी घेतली अखिलेश यादव यांची दिल्ली येथे भेट

सार्वभौम नेटवर्क
अखिलेश यादव यांची सदिच्छा भेट घेत महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा देताना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक लांबे
पुणे : प्रतिनिधी
समाजवादी पार्टी पुणे शहर पदाधिकारींकडुन समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत पुणे शहरातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान त्यांनी शहरातील राबविण्यात आलेले कार्यक्रम सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करीत पुणे शहरात लागु झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबतीत देखील चर्चा करीत निवडणुकीत उमेदवारांना पक्षाकडुन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अखिलेश यादव यांना यावेळी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा आणि फुले पगडी भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य  विनायक श्रीकृष्ण लांबे, समाजवादी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, प्रदेश महासचिव अनिस अहमद, पुणे शहर सचिव शहाजहान झारी, शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष जावेद शेख, प्रदेश युवक अध्यक्ष कृष्णा रोचकरी, भैरवनाथ मडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!