मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते ‘गगनभरारी – राजगड पर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी ) : कर्तुत्ववान व्यक्तींची संघर्ष गाथा सांगणाऱ्या ‘गगनभरारी – राजगड पर्व’ या पुस्तका चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभा खासदार प्रा.मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ज्या मान्यवरांना यंदाच्या गगनभरारी पुस्तकात मानाचे स्थान मिळाले त्यांचा सत्कार मेधाताई यांच्या हस्ते करण्यात आला .
समर्थ फाउंडेशन, पुणे संघर्षातून आयुष्य घडवणाऱ्या आणि समाजात चांगले काम करणाऱ्या मान्यवरांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवीता यावी या उद्देशाने गगनभरारी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजवर शिवनेरी पर्व आणि तोरणा पर्व या दोन पुस्तकांच्या माध्यमातून समर्थ फाउंडेशनने समाजातील अशाच नायकांची गाथा लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचा सन्मान केला आहे.
कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक श्री. विद्याधर ताठे, उद्योजक श्री. अविनाश चाबुकस्वार, फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण इनामदार, श्री. व्यंकटेश कल्याणकर, मा. स्वाती लोंढे – चव्हाण, मा. ज्योती इनामदार तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य व मान्यवर मंडळी उपस्थित होती.