माझ्या कामात अडथळे आणू नका , नाहीतर मी इथून पुढे तुमच्या विषयात सर्वात मोठा गतिरोधक असेल – वसंत मोरे
सार्वभौम न्युज समूह
कात्रज (प्रतिनिधी) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कात्रज चौक पुन्हा ट्रॅफिक जाम होतोय, त्या पाश्वभुमी वर कात्रज चौकाची पाहणी केल्यावर वसंत मोरे यांनी स्वतः पुढे होत काम करण्याचे ठरवले .
मनपा अधिकारी व हायवे वाले यांना कात्रज चौकाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी या अवाढव्य चौकाचे नियोजन करणे गरजेचे आहे असे वारंवार सांगितले तरी कोणाला वेळ भेटत नाही म्हणून काही निर्णय मी स्वतःच घेतोय असे वसंत मोरे म्हणाले .
त्या ठिकाणी कोण कोणत्या विषयाचा अभाव आहे ते खालील फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते .
जे मोठे आणि उंच बॅरिगेट पुलाच्या ठेकेदाराने पोलीस वाहतूक विभागाच्या सांगण्यानुसार लावले आहेत ते पडू नये म्हणून त्यांच्यावर मोठमोठे सिमेंट ब्लॉक ठेवले आहेत,
त्यामुळे एका बाजूला तीन फूट आणि दुसऱ्या बाजूला सात फूट जागा व्यर्थ जाते,
शिवाय या बॅरिगेटची उंची सहा फूट असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहने स्वारगेटच्या बाजूला असलेल्या वाहनांना दिसत नाहीत त्यामुळे अपघात घडत आहेत.
येत्या दोन दिवसात ही बॅरिगेट्स आम्ही हलवणार आहोत
पी.एम.पी.एम.एल बस स्टॉप हलवल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखू लागले परंतु कुणाला काय जमाल गोटा द्यायचा तो मला चांगला समजतो असेही ते म्हणाले .