मुंबईतील आंदोलनाला अखंड भारत समाज यांच्या कडून मदत
सार्वभौम न्युज पुणे
पुणे (प्रतिनिधि ) : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी मराठा बांधवांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मुंबईत मोठया प्रमाणात दाखल झालेले आहेत .
तसेच सरकारणे खाऊ गल्या व इतर बंदीचे आदेश निघाल्या मुळे मराठा आंदोलकां मध्ये नाराजीचा सुर होता . पण संपूर्ण महाराष्ट्रातून मदतिचा ओघ सुरू झाला त्या धरतीवर एक मदतीचा हात म्हणून
अखंड भारत समाज यांच्या वतीने मुंबईतील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा सेवकांना वारजे कर्वेनगर , पुणे भागातून चपाती, भाकरी, बिसलरी, लोणच्याचे डबे, चटण्या अशी सेवा करण्याची संधी मिळाली. मराठा सेवक म्हणून संतोष डोकं, प्रतीक जगताप, आप्पा बराटे, अनिल तावरे, सिद्धार्थ वाळके , मुरली जोरी मराठा सेवक उपस्थित होते