आगरी कोळी ओबीसी आरक्षणात,” मराठा आरक्षण” म्हणजे शूद्रांवर,
पुन्हा मनुस्मृती लादणे होय.
सार्वभौम न्युज समूह
वैदिक हिदू मनुस्मृती धर्माने सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी माळी या शूद्र जातींवर गुलामी लादली होती.
ती आजही आहे.
मनुस्मृती नुसार ब्राह्मण वैश्य यांच्याप्रमाणेच असलेले क्षत्रिय मराठे मुंबई मध्ये येऊन सांगत आहेत.
“आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या.”
यावर ओबीसींची संविधानिक प्रतिक्रिया अजूनही येत नाही.
परकीय इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच मोघल यांनी केलेले आक्रमण ओबीसींना समजते.
परंतु हिदू धर्मातल्या ब्राह्मण मराठा (क्षत्रिय) वैश्य यांचे अन्याय, अत्याचार त्यांना समजत नाहीत .
हे ओबीसींच्या गुलाम मानसिकतेचे “वास्तव” आहे.
या अत्यंत बिकट प्रसंगात, ज्या ओबीसींना प्रश्नच समजला नसेल?
तो वाचताच आला नसेल?
तर त्याचे उत्तर तो काय देणार?त्यामुळे या साविधानिक भारतात उच्चवर्णीय जातींच्या शोषणा विरुद्ध लढण्याचा खरा मार्ग समाज प्रबोधन हाच आहे.तो जसा ओबीसींना लागू आहे तसा उच्च वर्णीय मराठ्यांना लागू होतो.आरक्षणाच्या विषयी ओबीसी मध्ये जेवढे प्रबोधन हवे तेवढेच मराठा समाजामध्येही हवे.ओबीसी बोलतच नाहीत.परंतु मराठे जे बोलतात ते मुंबई सारख्या मातृसत्ताक सुसंस्कृत मुंबईत अशोभनीय अशा असंस्कृत भाषेत बोलत आहेत.
आरक्षण म्हणजे शिक्षणात आणि सरकारी नोकरीत ओबीसी उमेदवारांना प्रवेश प्रतिनिधित्व देणे ,एवढा छोटा अर्थ नाही.
भारताच्या जनगणने नुसार ओबीसींची देशातील लोकसंख्या ५२टक्के एवढी असेल.
तर देशाच्या एकूण साधनं संपत्तीत ५२ टक्के वाटा ओबीसींना मिळाला पाहिजे.सर्व क्षेत्रात तेवढे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.जमिनी उद्योग,साहित्य कला,राजकारण,प्रशासन,सरकारी खाजगी नोकऱ्या यात तेवढे प्रतिनिधित्व हवे.
परंतु हा आरक्षणाचा अधिकार कशामुळे प्राप्त झाला.?
अर्थात सामाजिक न्यायामुळे,मग आमच्यावर सामाजिक अन्याय केला कुणी ?
याचा शोध ओबीसींना घ्यावा लागेल.
त्याचे उत्तर महात्मा जोतिबा फुले,सावित्री माई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आबेडकर यांनी अगोदरच दिले आहे.
आज समस्त कोकणवासी ओबीसी मोठ्या प्रमाणात घरोघरी गणपती उत्सवात मग्न आहे.
अशा काळात भगवे ध्वज घेऊन त्यांचे हक्काचे “ओबीसी आरक्षण “घ्यायला हिंदू मराठा कशासाठी आलेत?
संकट मोचन श्री गणेशाला ही आरक्षण म्हणजे काय गोष्ट आहे?
हे कळले होते का?
आपल्या धर्म ग्रंथ वेद उपनिषदे कथा पुराणे यात वर्तमान आरक्षण प्रश्नावर कधी चर्चा झाली होती का?
आज चाललेल्या गणेश उत्सवात आरक्षणात पेटलेल्या मुंबई महाराष्ट्रात एक तरी गणेशभक्त या प्रश्नावर एखादे वाक्य बोलू शकतो.?
देव या सामाजिक प्रश्नावर उत्तर असू शकतो का?
किंवा हा प्रश्न देवाला नवस बोलून सुटू शकतो का?
मागच्या वर्षी जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाचे आंदोलन हे भारतीय संविधानाच्या कसे विरोधी आहे.?
हे अनेक व्हिडीओ मधून मी सागितले.
साऱ्या महाराष्ट्रात ही मुलाखतीची सोशल मिडिया गाजली.
यासाठी सर्व पत्रकार बंधू,अभ्यासू वाचक, प्रेक्षक यांचे मी मनापासून आभार मानतो.
मराठा समाजाचे शोषण कधीच कुणी केले नाही.तरीही त्यांना शूद्र ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न बामसेफच्या वामन मेश्राम यांनी केला होता.अनेक सरकारी मागास आयोग,मां सुप्रीम कोर्ट यांनी हा प्रयत्न हाणून पाडला.वास्तव मराठे हे मागास नाहीत क्षत्रिय आहेत हा सत्य इतिहास डोळ्यांनी पाहता येतो .एवढा स्वयं स्पष्ट आहे.
अर्थात मनुस्मृती धर्म ज्याला आम्ही वैदिक हिदू धर्म म्हणतो. त्यांनी ज्याचे शोषण केले,?समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांना प्रतिनिधित्व नाकारले .
ते शूद्र “ओबीसी” लोक म्हणजे आगरी कोळी भंडारी कराडी माळी लोक आहोत.
त्यांना इतिहासात हिंदू उच्च जातींनी नाकारलेली संधी देण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून समतेच्या तत्वाने “ओबीसी आरक्षण” करते.
अर्थात वर्तमान हिदूधर्म हा आमचा चुकलेला रस्ता आहे .
हे आम्ही ओबीसी जोपर्यत मान्य करीत नाही.
तोपर्यंत आरक्षण समजत नाही.
मी तुमच्यापेक्षा शहाणा नाही.
मलाही आरक्षण समजायला वयाची पस्तीस वर्षे घालवावी लागली.
लौकिक अर्थाने मी शिक्षक असूनही मला आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय आहे .
हे समजले नव्हते.
तो गरिबी हटाव कार्यक्रम नाही.
हिंदू धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे लोक इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच मोघल या परकीय शत्रू लोकांपेक्षा महा भयंकर असे, ओबीसी हिदू आगरी कोळी लोकांचे शत्रू आहेत.
असे मी म्हणालो?
तर माझे लोकच मला शत्रू समजतील.?
परंतु मी सांगतोय ते सत्य आहे.
याचा अलिकडचा पुरावा म्हणजे लोकनेते दि बा पाटील हे होत.
या देशातील १५टक्के एवढी छोटी लोकसंख्या असूनही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आम्हा ओबीसींना गुलाम कसे करतात?
यावर आधारित जन आंदोलन लोकनेते दि बा पाटील यांनी सुरू केले होते.
अर्थात ते हिंसक आदोलनाचे कधीच समर्थक झाले नाहीत.
लोकशाही मार्गाने अहिंसक पद्धतीने ते लढले.
तरीही मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी पोलिसांकडून आमच्या कराडी आगरी कोळी ओबीसींवर गोळीबार करून पाच माणसे मारली.
हजारो जखमी केली.
त्यातून आमच्या १००टक्के जमिनी सिडकोच्या नावाने मराठा ब्राह्मण यांनी लुटल्या आणि साडे बारा टक्के देतो ?असे नाटक केले.
आजही ते नाटकच करत आहेत.
स्वातंत्र्यंतर आलेल्या डझनवारी मराठा मुख्यमंत्र्यांनी ही लूट अखंड सुरू ठेवली आहे.
अलीकडेच पेशवे सरदार बिवलकर ब्राह्मण यांना आमच्या हक्कातील पाच हजार कोटींची जमीन सिडकोच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हा मोठा भ्रष्टाचार आहेच.
परंतु ओबीसींच्या जमिनीची लूट आहे.
यावर लढायला एकही आगरी कोळी ओबीसी तयार नाही.
यालाच “गुलामी “म्हणतात.
महाराष्ट्रात मराठे नेहमी जमीनदार सरंजामी उच्चवर्णीय म्हणूनच राहिले.
आम्ही यांच्या कडून आमच्या पिकवित असलेल्या जमिनी मालकीने मिळविण्यासाठी खोत सावकारी विरुद्ध कुळ कायद्याचे आंदोलन केले.
डॉ बाबासाहेब आबेडकर ना ना पाटील यांनी ते चालविले.
याचे नेतृत्व करायला कुणी मराठा ब्राह्मण वैश्य मारवाडी आला नव्हता ?
की त्यांनी आम्हाला कोणताही पाठिंबा दिला नव्हता.
आजही लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास मिळत नाही? यातील सर्वात मोठे विरोधक मराठा आरक्षणाचे कट्टर समर्थक,( सिडको) नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ही मुसलमान नाहीत.
तर हिदू क्षत्रिय मराठा आहेत.
कुळ म्हणजे नोकर,चाकर,गुलाम होय.
आम्ही पूर्वी गुलाम होतो.
याच ब्राह्मण मराठा वैश्य या जातींचे.
हा इतिहास तरुण मुलांना सांगायची हिंमत आहे तुमच्यात?
सत्य कटू असते.
आजची आमची जमीन घरे जंगल शिक्षण आरक्षण हे आमच्या पूर्वज लोकांनी लढून मिळविले आहे.
यात शेकडो लोक हुतात्मा झाले.
अनेक कंगाल झाले.
लढून मिळविलेल्या
ओबीसी आरक्षणात खोटे कुणबी दाखले घेऊन, रोज घुसखोरी मराठा बांधव करताहेत.सरकारची मदत त्यांना आहे.सरकार मराठ्यांचे आहे.
या चोऱ्या देव आणि धर्माला कधी दिसल्या नाहीत.?
आज तुम्हास वाटेल की मराठा समाजाला १० टक्के EWS आर्थिक मागास ,तसेच १० टक्के इसिबीसी ,ही दोन आरक्षणे सरकारनी दिली आहेत.
त्याचे फायदे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात त्यांनी घेतले सुद्धा.
अनेक महामंडळे काढून करोडो रुपयांची खैरात त्यांच्या जातींच्या मंत्र्यांनी त्यांना दिली.
मग आता ओबीसी मधूनच आरक्षण कशासाठी हवे?
केवळ आगरी कोळी ओबीसीनाच नाही ,तर आपल्या सोबतच्या मागास वर्गीय एससी एसटी आणि गुलाम स्त्रिया यांना जे राजकीय आरक्षण ग्रामपंचायत,महानगर पालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद यात आमच्या पूर्वज महा मानवांनी, फुले शाहू आंबेडकर यांनी दिले.
भारतीय संविधानाने जे पक्के केले.
ते सारे समतेचे कायदे संपवून, विषमता माजविण्यासाठी आजचे मराठा आंदोलन आहे.
भारतीय संविधानाच्या विरोधी असलेले हे ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या.
हे पुन्हा जुलमी क्षत्रिय जातींचा स्थानिक स्वराज्य संस्थेत, नव्याने क्षत्रिय सत्ता मिळवून समस्त स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांना पुन्हा गुलाम करण्याचा डाव आहे.
याला मुंबई मध्ये आंदोलनाची परवानगी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षम्य चूक केली आहे.
यात भयंकर परिणाम देशातील ८५टक्के ओबीसी एससी एसटी यांना भोगावे लागतील.
त्याचबरोबर जे बलवान झालेले वैश्य अदानी अंबानी देशाच्या आर्थिक विषमतेला जबाबदार झालेत.
त्याचप्रमाणे ब्राह्मणाचे पारंपरिक शत्रु क्षत्रिय मराठे बलवान झाले,?
तर देशात यादवी माजू शकते.?
आम्ही मनुस्मृती केव्हाच जाळली आहे.
तीही रायगड जिल्ह्यात.
याचा स्पष्ट अर्थ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची धर्म सत्ता संपवून भारतात समता प्रस्थापित केली.
तुम्हास वाईट वाटेल.
परंतु इग्रज सत्ता नसती?
तर देशातील स्त्री शूद्र अतिशूद्र यांना न्याय मिळाला नसता.
वर्तमान देवेंद्र फडणवीस याचे गृहखाते क्षत्रिय जातींच्या अरेरावी समोर झुकले आहे.
नेहमी व्यापारातील फायदा पाहणारे सन्माननीय पंतप्रधान मोदी, देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी देशाला स्वातंत्र्य कोणापासून हवे होते? याचा अर्थ अजून समजून घेतलेला नाही.
देशातील साविधानिक संस्था न्यायव्यवस्था,निवडणूक आयोग,प्रशासन धोक्यात आले आहे.
हे तुम्ही जाणता.
आता मागास नसलेल्या मराठा समाजाला ओबीसी म्हणजे शोषित शूद्र आगरी कोळी यांचे आरक्षण देणे?
म्हणजे न्याय बंधुता समता स्वातंत्र्य संपविणे होय.
मागच्या काळात मी केलेल्या आरक्षणाच्या प्रबोधनासाठी शेकडो फोन आले.
ते निश्चितच मला ताकद देणारे आहेत.मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
परंतु आता केवळ ओबीसी आरक्षण वाचवायची लढाई नाही.?
तर देश आणि संविधानाचा न्यायाचा खरा धर्म आपल्याला वाचवायचा आहे.