Home » ताज्या बातम्या » मराठा आरक्षणाचा GR घेतल्या नंतर, आता सरकारकडून जरांगेंची नवी मागणी

मराठा आरक्षणाचा GR घेतल्या नंतर, आता सरकारकडून जरांगेंची नवी मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
112 Views

मराठा आरक्षणाचा GR घेतल्या नंतर, आता सरकारकडून जरांगेंची नवी मागणी

सार्वभौम न्युज समूह

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ) : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या बाजूने आणि विरोधातही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावरून ओबीसी नेत्यांकडून सरकारवर टीका होत असल्याने काल मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींसाठी उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी नवी मागणी करत सरकारची कोंडी केली आहे.

 

“सरकार म्हणजे राज्यातील साडेचौदा कोटी जनतेचे मालक आहेत. तुम्ही ओबीसींसाठी उपसमिती स्थापन केली आहे तर आता आणखी एक काम करा. राज्यातील दलित आणि मुस्लीम समाजासाठीही उपसमिती स्थापन करा. एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी स्थापन करा आणि मायक्रो ओबीसींसाठी एक वेगळी उपसमिती स्थापन करा,” अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तसंच ओबीसींसाठी जी उपसमिती स्थापन करण्यात आली तिचा मायक्रो ओबीसींना काहीच फायदा होणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत करण्यात आली असेल तर आमची काही नाराजी नाही, विरोध नाही. गोरगरीब ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करण्यात आले असेल तर आमची काही हरकत नाही. पण मी माझ्या समाजास आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कितीही उपसमित्या स्थापन केल्या, माझ्या अंगावर सोडल्या, राजकारणी लोकांचं ऐकून आमच्यावर टीका केली तरी मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देतोय, याची समाजाला खात्री आहे. मराठ्यांना ओबीसीत मीच घालणार आणि मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मीच देणार. त्यामुळे कोणीही काहीही बोललं तरी फरक पडणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!