गणेशोत्सवाच्या निमित्त कर्वेनगर येथे बाल जत्रा महोत्सवाचे आयोजन
कर्वेनगर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव निमित्त श्रमिक वसाहत मध्ये बाल जत्रा महोत्सव घेण्यात आला . बाल महोत्सव जत्रा चे दुसरे वर्ष आहे . श्रमिक ज्ञानदीप मित्र मंडळ 39 वर्षात पदार्पण केले आह .
सातत्याने श्रमिक ज्ञानदीप मित्र मंडळ छोट्या मुलांकरता वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम घेते . बाल जत्रेचा उद्देश एकच असतो की वस्ती विभागातील मुलांना बाहेर कुठे जाता येत नाही व पैसा अभावी मुलं खेळू शकत नाही म्हणून मंडळातर्फे बाल जत्रा महोत्सव भरण्यात येतो . या महोत्सवात वस्ती विभागातील सर्व बालगोपाळ आनंद घेतात . बाल जत्रेत मिकी माऊस , जम्पिंग – जपांग , पाण्यातील बोट इत्यादी खेळणी मुलांकरिता असतात मुले याचा मनसोक्त आनंद घेत खेळतात .
मंडळाचे अध्यक्ष आकाश राऊत , कार्याध्यक्ष सचिन खरात , खजिनदार नंदू चळवदे , सदस्य वैभव खरात , दत्ताभाऊ पवळे यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजन करण्यात आले .