उद्योगपती मुकेश अंबानीचं या कामासाठी विशेष अभिनंदन….
सार्वभौम न्युज समूह
परवा मित्रासोबत सांगलीच्या रिलायन्स मॉल मधे गेलेलो… बॅगेज काऊण्टर वर एका मुलीने बॅग घेऊन टोकन दिले…. तिच्या उजव्या हाताला बोटंच नव्हती… मला थोडं आश्चर्य वाटलं…
आतमध्ये गेल्यानंतर एका सेल्समनला 4 वेळा बोलावलं तरी तो आमच्याकडे बघेना.. इतक्यात एक दुसरा सेल्समन धावत आला अन् त्याने सांगितलं… सर त्याला ऐकू येत नाही.. आम्ही अचंंबीत झालो…..
पुढे एका स्टॉल जवळ दोघे सेल्समन हातवारे करुन एकमेकाला काहीतरी सांगत होते…मी ओळखून चुकलो… यांना बोलता येत नाही….पुन्हा एक धक्का…आणखी एका काऊंटर वर असाच एका हाताने थोडा अधू असलेला मुलगा दिसला…
बिल झाल्यावर आम्ही बाहेर आलो तर दारातच एकाने हाक मारली… साहेब नारळ पाणी घ्या ना… मी वळून पाहिलं…. तो बोलत बोलतच बाहेर आला… त्याला नीट ऊभंही राहता येत नव्हतं…. काठी हातात घेऊन कसाबसा उभा राहिला…. आता मात्र डोकं फिरायची वेळ आली…
मी तिथल्या एका अधिकाऱ्यापाशी गेलो अन् विचारलं…. ही नेमकी काय भानगड आहे?
त्याने सांगितलं…
मुकेश अंबानींनी देशातील रिलायन्सच्या प्रत्येक मॉल मधे किमान 25 ते 30 विकलांग मुलांना रोजगार देण्याचा आदेश काढलाय….
ऐकून जाम भारी वाटलं मुकेश अंबानीबद्दल ….
बघा अंबानी अदानी ना आपलीच लीक नावं ठेवतात
– संतोष माणकापूरे