Home » धर्म » वारजेत डिजेच्या दणदणाटासह पारंपारिक वाद्याच्या निनादात मिरवणूका संपन्न

वारजेत डिजेच्या दणदणाटासह पारंपारिक वाद्याच्या निनादात मिरवणूका संपन्न 

Facebook
Twitter
WhatsApp
92 Views

वारजेत डिजेच्या दणदणाटासह पारंपारिक वाद्याच्या निनादात मिरवणूका संपन्न 

सार्वभौम न्युज समूह

वारजे :

कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवणे उत्तमनगर, कोंढवे धावडे परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूका डिजेच्या दणदणाटा सह पारंपारिक वाद्याच्या निनादात अन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात तब्बल पंधरा तासांनी विसर्जन मिरवणुक संपन्न झाल्या.

विसर्जन दिवशी सकाळ पासूनच सुरु झालेल्या आणि रात्री उशिरा संपलेल्या मिरवणुकीत वारजे माळवाडीतील सार्वजनीक मंडळांच्या जवळपास १६३ मूर्तींचे विसर्जन झाले. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीमधील एकूण ८ हौद व ३१ ठिकाणावरील ७४ लोखंडी टाकी मध्ये घरगुती व सार्वजनीक मंडळांचे मिळून एकूण शेवटच्या दिवशी २६ हजार ९८० मूर्तींचे विसर्जन झाले. तसेच ७३४ मुर्तींचे संकलन करण्यात आले.

वारजे माळवाडी रस्त्यांवर सकाळपासून मुर्ती विसर्जनासाठी मंडळांची लगबग सुरू होती. पारंपारिक वाद्यांसह स्पीकर च्या दनदनाटाने परिसर अगदी दणाणून गेला होता. तब्बल पंधरा तास सुरू असलेल्या गणेश मंडळ मिरवणूकांचे स्वागत करण्यासाठी वारजे पोलिस शांतता दक्षता समितीचे ॲड. राहुल पाटील व सदस्यांनी स्वागत केले. तर माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, भारतभूषण बराटे, युवक काँग्रेसचे सचिन बराटे, माजी नगरसेवीका भाग्यश्री दांगट, मनसेचे कैलास दांगट तसेच अर्चना ढेणे यांच्या वतीने हायवे चौक परिसरात स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विसर्जन च्या दिवशी संपूर्ण दिवसभरात ३९ हजार ७३९ किलो निर्माल्य जमा करण्यात आले. असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी तसेच खाजगी संस्थासह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून निर्माल्य व्यवस्थापन मोहीमेत सहभाग घेण्यात आला होता.

सकाळी अकराच्या सुमारास वारजे गावठाणातील नावाजले जयहिंद तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ, वारजे बस स्टॉप येथील विकास तरुण मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ व माळवाडीतील भोपळे चौक, श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ

च्या मुर्ती चे विसर्जन झाले. तसेच दत्तनगर मधील युवराज मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील समर्थ शिवराय मित्र मंडळ, निळकंठ मित्र मंडळ व सम्राट मित्र मंडळ ट्रस्टच्या मुर्तीचे शेवटी रात्री विसर्जन झाले. तसेच माळवाडीतील माजी नगरसेवक सचीन दोडके, संजय दोडके यांच्या शिवशक्ती प्रतिष्ठाणचा व निलेश घारे यांच्या महाराजा मित्र मंडळाकडुन कर्वे रोड ते डेक्कन पर्यंत भव्य मिरवणुक सोहळा आयोजीत केला होता.

वारजे माळवाडी रस्त्यांवर सकाळपासून मुर्ती विसर्जनासाठी मंडळांची लगबग सुरू होती. पारंपारिक वाद्यांसह स्पीकर च्या दनदनाटाने परिसर अगदी दणाणून गेला होता. तब्बल पंधरा तास सुरू असलेल्या गणेश मंडळ मिरवणूकांचे स्वागत करण्यासाठी वारजे पोलिस शांतता दक्षता समितीचे ॲड. राहुल पाटील व सदस्यांनी स्वागत केले. तर माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, भारतभूषण बराटे, युवक काँग्रेसचे सचिन बराटे, माजी नगरसेवीका भाग्यश्री दांगट, मनसेचे कैलास दांगट तसेच अर्चना ढेणे यांच्या वतीने हायवे चौक परिसरात स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विसर्जन च्या दिवशी संपूर्ण दिवसभरात ३९ हजार ७३९ किलो निर्माल्य जमा करण्यात आले. असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी तसेच खाजगी संस्थासह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून निर्माल्य व्यवस्थापन मोहीमेत सहभाग घेण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!