ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये आविष्कार कार्यशाळेची यशस्वी आयोजन
सार्वभौम न्युज समूह
पुणे (प्रतिनिधी ) : कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलामधील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘एक दिवसीय आविष्कार कार्यशाळेचे’ आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या 17 वर्षात अविष्कार राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेमध्ये उत्तुंग यश प्राप्त केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणून महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने आविष्कार राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊन विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सायन्स व इनोव्हेशन पार्क, इंक्युबॅशन सेंटर व ASPIRE सारख्या प्रोत्साहन योजनांशी जोडण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन स्तरावरती आविष्कार कार्यशाळांचे आयोजित करण्याचे सुचवले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी आविष्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी संशोधनामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. रामकृष्ण ठाणगे, सेंट विन्सेंट महाविद्यालय पुणे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन समितीच्या अर्थसहाय्याने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
“या कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढीस लागून संशोधन संस्कृती बळकट करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे” असे प्रतिपादन मार्गदर्शक प्रा.डॉ. राधाकृष्ण ठाणगे यांनी केले.
या कार्यशाळेसाठी के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मेजर जनरल समीर कल्ला सर हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरजी लावरे यांनी देखील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. सचिन आल्हाट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनाजी व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.विनायक हिरे, प्रा.मयुरी जाधव, प्रा.वैभवी जाधव, प्रा.पूर्वा काणे, प्रा.रचना भागवत, कार्यालयीन सहकारी प्राजक्ता सोनवलकर, निलेश कामठे, ओमकार जाधव, अमोल जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील कला, वाणिज्य,आणि विज्ञान विभागातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.