नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी PMPML कडून एक महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध
सार्वभौम न्युज समूह
शिवणे (प्रतिनिधी ) : पुणे महानगर प्रादेशिक परिवहन महामंडळ (PMPML) च्या माध्यमातून,व श्री. सचिन विष्णू दांगट यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी PMPML कडून एक महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली.
सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ व्हावी यासाठी नवीन मार्ग विस्तार व सेवा सुरू करण्यात आली आहे:
मार्ग विस्तार:
स्नेहा विहार (दांगट पाटील नगर) – दांगट इस्टेट – खान वस्ती – वारजे चौक – कर्वेनगर – SNDT – डेक्कन
या नव्या सोयीमुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, विद्यार्थी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रवास अधिक सोपा, सोयीस्कर आणि परवडणारा होणार आहे.
ही सेवा उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे सचिन विष्णू दांगट यांचे समाजातून सर्व स्तरामधून कौतुक होत आहे यापुढे सुद्धा नागरिकांच्या समस्या आम्ही अशाच प्रकारे सोडवत राहू असेच हभप ममता सचिन दांगट यांनी सांगितले
यावेळी पी एम पी एम एल चे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि भागातील सर्व नागरिक आणि भाजपा पदाधिकारी किरण बारटक्के, उमेशजी सरपाटील, सुभाष भाऊ नाणेकर, अभिजीत धावडे, दत्ताभाऊ कोल्हे, किरण हगवणे, संदीपआप्पा देशमुख, संतोष नाना देशमुख, रघु आप्पा दांगट, बंडू नाना दांगट, दिलीप भाऊ कदम,निखिल दांगट, कुणाल दांगट, कुंदन दांगट, ललित दांगट, गणेश गावंडे, अभी कांबळे, प्रकाश साळवे, श्रीराम कुलकर्णी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यासाठी नारायण करडे साहेब वाहतूक नियोजन व संपर्क अधिकारी आणि सुरेंद्र दादा दांगट डेपो मॅनेजर कोथरूड विभाग यांचे सहकार्य लाभले