Home » राजकारण » छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले

छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले

Facebook
Twitter
WhatsApp
65 Views

छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले

सार्वभौम न्युज समूह

 

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आज रत्नागिरी दौऱ्यावर होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, भुजबळांची नाराजी, कुर्डू गावातील मुरूम, उपराष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी अजित पवारांची अनुपस्थिति, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

मराठा (Maratha) आरक्षणासंदर्भाने बोलताना, कोणावरी अन्याय केला जाणार नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली असून शासनाने काढलेला मराठा-कुणबी जीआर रद्द करावा, असेही म्हटले आहे.

ओबीसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच, सरकारने आम्हाला विश्वासात न घेता मराठा-कुणबीचाजीआर काढला आहे. त्यामुळे, हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या जीआरवरुनमहायुतीमध्येछगन भुजबळ नाराज आहेत का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटककाला नाराज करायचं नाही, असे उत्तर उपमुख्यमंत्र्‍यांनी दिले.

आयपीएस अंजली कृष्णांयांच्यासमवेतफोनवर संवाद साधताना अजित पवारांनी अरे-तुरेची भाषा वापरत दम दिल्याचा व्हिडिओव्हायरल झाला होता. तेव्हापासून अजित पवार हे माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे,आज कोकणातील कार्यक्रमानंतर पत्रकरांशीकुर्डूतीलमुरुम वादावर बोलताना, जे नियमाने असेल ते करावे असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मला कुर्डूतीलव्हायरलव्हिडिओबद्दल त्याबद्दल जे ट्विट करायचे ते केले आहे, कायद्याने नियमांच्या गोष्टी करायच्या असतील तर करण्याची प्रत्येकाला मुभा आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवरही दादांनी भाष्य केलं. मी अज्ञातवासात कधीच जात नाही, मी डॉक्टरकडे होतो, वाटल्यास डॉक्टरांना विचारा असे अजित पवार म्हणाले.

उपराष्ट्रपतींची घरी जाऊन भेट घेणार

आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे, उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, आता त्यांच्या घरी जाऊन आम्ही भेट घेणार आहोत. परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती, असे शपथविधी सोहळ्याच्या अनुपस्थितीबाबत सांगताना त्यांनी म्हटले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!