पितृपक्षाच्या शेवटच्या दिवसांत या चुका अजिबात करू नका, श्राद्ध भोजनात हे नियम अवश्य पाळा
सार्वभौम न्युज समूह
पितृपक्षात आपल्या पितरांचे पूजन,तर्पण, श्राद्ध घालण्याला अत्यंत महत्व असते. यामुळे पितर प्रसन्न होतात व आपल्या कुटुंबावर अपार कृपा करतात असे मानले जाते. पितरांच्या आशीर्वादामुळे पितृदोष नाहीसा होतो.
त्यामुळे पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध घालण्याची पद्धत आहे. याकाळात आपल्या पितरांसाठी भोजन करण्यात येते. मात्र या भोजनाचे काही नियम आहेत. पितरांच्या श्राद्ध भोजनात कोणते पदार्थ असावेत व कोणते पदार्थ निषिद्ध आहेत हे शास्त्रात नमूद केले आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृ भोजन करण्यासाठी हे नियम अवश्य पाळावेत.
श्राद्ध भोजनात वापरा या गोष्टी
श्राद्धामध्ये तीळ, जव, सावा, तांदूळ, गहू, गाईचे दूध आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू, मध, साखर, महाशाक (एक प्रकारची भाजी), बेल, आवळा, द्राक्ष, फणस, डाळिंब, अक्रोड, शिंगाडा, नारळ, खजूर, संत्री, बोर, सुपारी, आले, जांभूळ, पडवळ, गूळ, कमळगट्टा, लिंबू, पिंपळ अशा भाज्या आणि फळे श्राद्ध भोजनात वापरणे चांगले मानले जाते. ह्या गोष्टींचा उल्लेख वायु पुराण, श्राद्धचंद्रिका, श्राद्धविवेक, श्राद्धप्रकार, श्राद्धकल्प या ग्रंथांमध्ये आहे.
श्राद्ध भोजनात कोणत्या गोष्टी वापरू नयेत
श्राद्ध भोजनात प्रामुख्याने चणा, मसूर, मोठा उडीद, कुळथी, सत्तू, मूळी, काळे जिरे, काथ, काकडी, काळे मीठ, भोपळा, कोवळा, तिळाची पालेभाजी, काळी सरसोची पाने, शतपुष्पी आणि कोणतेही शिळे, सडलेले, कच्चे, अपवित्र फळ किंवा अन्न श्राद्धामध्ये वापरू नये.
श्राद्ध घालताना भोजन ताटाचे नियम
धर्मशास्त्रानुसार श्राद्धाच्या भोजनात पितळेची भांडी वापरावी. तसेच केळीच्या पानावर श्राद्ध भोजन करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. श्राद्धामध्ये पितरांना जेवण देण्यासाठी मातीची भांडी वापरावी. मातीच्या भांड्यांबरोबरच लाकडी भांडी किंवा पानांचे द्रोण (पण ते केळीच्या पानाचे नसावेत) वापरू शकता. श्राद्धामध्ये पितरांना चांदीच्या भांड्यातून जेवण देणे खूप महत्त्वाचे व शुभ मानले जाते. सोने, तांबे आणि कांस्य धातूची भांडीसुद्धा वापरू शकता पण लोखंडाची भांडी कधीही वापरू नये.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी हे अवश्य करा
श्राद्ध करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तीळ हे देवाचे अन्न मानले जाते. काळ्या तिळामुळे पितर संतुष्ट होतात. त्यामुळे श्राद्ध करताना काळ्या तिळाचा वापर करावा. श्राद्ध नेहमी दक्षिणेकडे तोंड करून करावे. श्राद्ध करण्यासाठी आसनावर बसणे आवश्यक आहे. कुशाचे आसन सर्वोत्तम मानले जाते. लाकडी पाटाचा वापर करू शकता पण त्याला लोखंडी खिळे नसावेत. लोकर किंवा रेशमाच्या आसनाचा वापर करणेसुद्धा शुभ मानले आहे असे श्राद्धकल्पलता नावाच्या ग्रंथात सांगितले आहे.
टिप : हि केवळ एक माहिती आहे . आपल्याला पटेल ते करा .