सिंहगड गडदैवत चौंडाई देवी मंदिर परिसर साफसफाई मोहिम यशस्वीरीत्य पुर्ण
सावभौम न्युज समूह
पुणे (प्रतिनिधी) : गड किल्ले संवर्धन संस्था. महाराष्ट्र राज्य सिंहगड विभाग यांच्या वतीने सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई देवी मुळ मंदिर परिसर साफसफाई मोहिम दिनांक- १४\९\२०२५ रविवार दिवशी यशस्वीरीत्य पुर्ण करण्यात आली.
आतकरवाडीतुन किल्ले सिंहगडावर पाईवाटेने थोडे अंतर चालून वर गेले असता. डाव्या हाताला भातखळ्यांच मोठ मैदान दिसते. मैदानातून डाव्या हाते एक छोटी पाईवाट मंदिराच्या दिशेने जाते. या वाटेने काही अंतर चालून गेल्यावर निसर्गाच्या कुशीत गर्द दाट जंगलझाडी मध्ये आदिशक्ती आई चौंडाई देवीचे सुंदर मंदिर आहे. तेथील मंदिर परिसर अतिशय सुंदर असल्याने मनाचा थकवा आपसूकच निघून जातो.
यंदाचे शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापना २२ सप्टेंबर २०२५ दिवशी आहे. या घटस्थापनेच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी संस्थेच्या वतीने हि साफसफाई मोहिम राबविण्यात येते.
या मोहिमेची सुरवात सकाळी ९ वा सुरू करण्यात आली. या वेळी मंदिर परिसरात वाढलेली छोटी काटेरी झाडं, झुडपं, गवत काढण्यात आली. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्याने मंदिर परिसरात खुप गवत वाढलेले होते ते हाताने काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. दुपारी मंदिरात रंगेबी रंगी पताकाच्या माळा व भगव्या रंगाचे झेंडे परिसरात लावण्यात आल्या यामुळे मंदिराच्या शोभेत भर पडल्या सारखे वाटू लागले. ह्या ठिकाणास जसे नैसर्गिक महत्त्व आहे तसेच ऐतिहासिक महत्व सुद्धा लाभले आहे. आदिशक्ती चौंडाई माता हि किल्ले सिंहगडाची गडदैवत आहे. पुर्वी शिवकाळात व शिवकाळा नंतर या मंदिराच्या तेल व दिवा बत्तीसाठी जो खर्च येत असतं तो खर्च गडावरती पैशातून खर्च दिला जात असे. अशी नोंद जुन्या पुस्तकात आढळते. याच बरोबर या ठिकाणचा नवरात्र उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जात असे. आजही या ठिकाणी नवरात्र उत्सव आजू बाजूच्या परिसरातील भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला दिवशी दरवर्षी यात्रा (उरूस) भरते. या दिवशी ग्रामस्थ व देवीचे भाविक भक्त देवीची मोठ्या उत्साहात वाजत गाजत गावातुन देवीची पालखी काढतात.
या मोहिमेची सांगता सायंकाळी ४ वा देवीची आरती व छत्रपतींची शिव वंदना म्हणून करण्यात आली. या मोहिमेस आतरवाडी घेरा सिंहगड स्थानिक ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश सांगळे यांचे चांगले सहकार्य लाभले. या मोहिमेचे आयोजन सिंहगड विभाग प्रमुख श्री शांताराम लांघे, श्री विजय साळेकर यांनी केले. या मोहिमेत संस्थेचे एकूण १४ दुर्ग सौनिक सहभागी झाले होते.अशी माहिती संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री साईनाथ जोशी यांनी दिली.