पुणे शहर पुन्हा एकदा गँगवार फायरिंग मध्ये मांडिवर गोळी लागुन एक जण जखमी
कोथरूड परिसरात केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून फायरिंग करून दहशत माजवली. फायरिंग निलेश घायवळ गॅगच्या सदस्यांकडून करण्यात आली असून गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या फायरिगं मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
प्रकाश धुमाळ हा युवक या गोळीबारात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मयूर कुंभारे यांनी थेट गोळीबार केला, यात धुमाळ यांच्या मांडीवर गोळी लागली.
या प्रकरणी मयुर कुंभारे सहित एका साथिदाराला कोथरूड पोलिसांनी अटक केली असुन बाकी आरोपींचा शोध चालू आहे