37 Views

पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी इच्छुक कामाला लागले असुन पुणे शहरातील प्रत्येक चौकामध्ये जनसंवाद मेळाव्याचे होल्डिंग पाहायला मिळत आहेत तसेच नागरिकांनी या ठिकाणी येत्या 24 तारखेला येऊन आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षामार्फत केलेले आहे या अभियानाची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघात मागच्या आठवड्यापासून चालू झालेली आहे या आठवड्यात खडकवासला मतदारसंघांमध्ये राबवण्यात येत आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये हे अभियान टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून यावरून असे दिसते की दादांनी पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे