एक जुनी कथा आहे :पण नव्याने
ईश्वराने माणूस निर्माण केला. माणूस एकटा होता. त्याने प्रार्थना केली.. “मी एकटा आहे, माझं मन लागत नाही.” मग ईश्वराने स्त्रीची निर्मिती केली.
तेव्हापर्यंत सगळं काम पूर्ण झालं होतं, ईश्वराने सगळं विश्व निर्माण केलं होतं. नवीन काही उरलं नव्हतं म्हणून त्याने वेगवेगळ्या ठिकाणांहून थोडं–थोडं घेतलं. चंद्रापासून थोडी चांदणी, सूर्यापासून थोडं तेज, मोरापासून थोडे रंग, सिंहापासून थोडी झेप अशी सगळी वैशिष्ट्यं गोळा करून त्याने स्त्री बनवली. कारण आधी पुरुष निर्माण झाला होता, पण शेवटी हा पठया म्हणाला की “एकटेपणात मन लागत नाही.”
म्हणून स्त्री निर्माण झाली. पण स्त्री म्हणजे एक कोडंच! कधी ती गाते.. कोकिळेसारखी, तर कधी सिंहिणीसारखी डरकाळी फोडते. कधी चंद्रासारखी शीतल, तर कधी सूर्याप्रमाणे प्रखर. राग आला की सूर्य, प्रेम आलं की चांदणी.
तीन दिवसात पुरुष थकून गेला. तो म्हणाला .. “ही तर मोठी समस्या आहे, एकटं राहणं यापेक्षा बरं होतं. स्त्रीसोबत राहूनच कळलं की एकांत किती सुंदर आहे. ब्रह्मचर्याचा आनंद हा गृहस्थाश्रम केल्याशिवाय कळत नाही.”
तो पळतच ईश्वराकडे गेला, “चूक झाली, मला ही स्त्री नको. ही तर वेडं करून टाकीन मला. विश्वास ठेवताच येत नाही हिच्यावर. . कधी गाते, कधी रागावते, काही कळतच नाही. ही तर खूप अवघड आहे. तुम्हीच सांभाळा.”
ईश्वर म्हणाला, “जशी तुझी मर्जी.”
पुरुषाने तीन दिवस ईश्वराकडे सोडली. पण घरी जाऊन बिछान्यावर पडला तसा तिची आठवण यायला लागली. तिचे गोड गाणे, गळ्यातले आलिंगन,
तीन दिवसांनी परत पळत आला, “क्षमा करा, मला ती स्त्री परत द्या. घरातली गोड गुनगुन, स्वागत करायला दाराशी उभी राहनं , थकून आल्यावर हसत चहा देणे… तिच्याशिवाय खूप उदास वाटते.”
ईश्वर म्हणाला – “जशी तुझी मर्जी.”
पण पुन्हा तीन दिवसातच स्थिती पहिल्यासारखीच वाईट झाली. तो परत आला. तेव्हा ईश्वर म्हणाला – “आता पुरे झालं! तुला स्त्रीशिवाय राहताही येत नाही, आणि तिच्याशिवाय जगताही येत नाही. मग जसं आहे तसं जग बाबा.”
तेव्हापासून माणूस जगतो आहे… कधी संतुष्ट, कधी असंतुष्ट.
कारण पुरुषाला स्थैर्य मान्य नसतं. त्याच्या मनात भटकंती असते. त्यामुळे तो कधी स्त्रीसोबत, कधी स्त्रीशिवाय सुख शोधतो.
तू गृहस्थीत असशील तर आश्रम गोड वाटेल. आश्रमात असशील तर गृहस्थीची आठवण येईल. मुंबईत असशील तर काश्मीर, काश्मीरमध्ये असशील तर मुंबई.
संसारात सुख-दुःख मिश्रित असतं. चंद्र आहे, सूर्य आहे, मोर नाचतात, सिंह डरकाळी फोडतो. जेव्हा आपण संसारात असतो तेव्हा दुःख जाणवतं, आणि दूर गेल्यावर सुखांच्या आठवणी उजळतात.
म्हणून जीवनात जे काही घडतंय ते सहजपणे होऊ द्या. ना काही सोडायचा अट्टाहास, ना काही पकडायचा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तेव्हाच जीवन सहजसुंदर होईल.
बर तर मला एक सांगा… तुम्ही राहू शकता का बायकोशिवाय?
साभार – फेसबुक