Home » ताज्या बातम्या » मनोज जरांगेंना छत्रपती घराण्याचा सर्वात मोठा धक्का, हैदराबाद गॅझेटवर शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगेंना छत्रपती घराण्याचा सर्वात मोठा धक्का, हैदराबाद गॅझेटवर शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य

Facebook
Twitter
WhatsApp
279 Views

मनोज जरांगेंना छत्रपती घराण्याचा सर्वात मोठा धक्का, हैदराबाद गॅझेटवर शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य

 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती, मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये उपोषणाला बसले होते, त्यांच्या या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले, या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली, या आंदोलनाला मोठं यश मिळालं, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी मान्य झाली.

 

दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर आता शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शाहू महाराजांच्या या विधानानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले शाहू महाराज?

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट लागू करण्याच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे, कोल्हापुरातील भवानी मंडपात कोल्हापूर गॅझेटचं आणि पेनाचे पूजन करून या आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आणि इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली, यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आज वेगळ्या पद्धतीची खंडे नवमी आपण साजरी करतोय, परंपरेनुसार आज शस्त्रांचं पूजन करायचं असतं. भारताने आता लोकशाही स्विकारलेली आहे, त्यामुळे आता त्याच रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे. संविधानाच्या चौकटीतूनच आपल्याला पुढे जावं लागेल, संविधान लवचिक आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील, हे अडथळे दूर केले तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असं शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेक पातळ्यांवर मराठा हा समाज मागासलेला आहे हे आता सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे मी गेले दोन वर्ष सांगत आलोय. मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणातून मिळणाऱ्या नोकरीवर अवलंबून न राहता पुढे जाण्यासाठी इतर मार्ग देखील अवलंबले पाहिजेत.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये 1902 च्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही होत नाही, हे दुर्दैव आहे. हैदराबाद गॅझेट हे निजामाने केलेलं गॅझेट आहे. ज्या निजामाला आपण तीन वेळा हरवलं, त्या निजामाचं गॅझेट आपण का स्वीकारतोय? हे मला कळत नाही. मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही, असं मोठं विधान शाहू महाराज यांनी यावेळी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!