Home » ताज्या बातम्या » हवामान खात्याने दिली माहिती , 8 ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार ?

हवामान खात्याने दिली माहिती , 8 ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार ?

Facebook
Twitter
WhatsApp
169 Views

हवामान खात्याने दिली माहिती , 8 ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार ?

 

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊसकधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत.

अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र, 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

तक्रारींवर थेट उपाय! RPO पुणेचं ओपन हाऊस बनलं नागरिकांचं व्यासपीठ

7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात 29 सप्टेंबर 2025 पासून हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल.

वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. राज्यात 7 ऑक्टोबर 2025 पासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे 8 ऑक्टोबर 2025 पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात धो धो पाऊस कोसळला होता.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, वाशिम, नाशिक, ठाणे,रायगडसह मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक जिल्ह्यात रस्त्यांवर सखल भागात पाणी साचलं होतं आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसच काही ठिकाणी वीजेचा लपंडावही सुरु होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!