Home » ब्लॉग » शिरूरमध्ये ‘आमदार’ स्टिकरची गाडी सुसाट; पोलीस-आरटीओ मौन, कायद्याची पुन्हा हत्या!

शिरूरमध्ये ‘आमदार’ स्टिकरची गाडी सुसाट; पोलीस-आरटीओ मौन, कायद्याची पुन्हा हत्या!

Facebook
Twitter
WhatsApp
10 Views
शिरूर शहरात पुन्हा एकदा ‘आमदार’ स्टिकर असलेली लाल रंगाची स्वीप्ट कार पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांच्या नाकाखाली बिनधास्त धावली. गाडीवर पुढील-मागील नंबर प्लेट नव्हत्या, त्या डिकीत ठेवलेल्या होत्या, तसेच काळ्या काचा लावलेल्या होत्या. ही गाडी तहसील कार्यालयाजवळ उभी असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी पोलिसांना कळवले. मात्र, एकाही पोलिसाने घटनास्थळी हजेरी लावली नाही.
यानंतर शिरूर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पण कारवाईसाठी अधिकारी स्वतः न जाता एका एसटी चालकाला गाडीजवळ पाठवण्यात आले. इतक्यात चालक कार घेऊन पसार झाला.
सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी विचारणा केल्यावर महिला आरटीओ अधिकाऱ्यांनी “टॅक्स नसेल तर डिटेन करण्याचे अधिकार आहेत, बाकी प्रकरण आमच्या कक्षेत नाही” असे सांगत जबाबदारी झटकली. तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “मशीनमध्ये फोटो नीट येत नाही” असा दावा करत मोबाईलने फोटो घेऊन कारवाई केली.
या प्रकरणात नाममात्र चलन करून केवळ कारवाईचा देखावा करण्यात आला. त्यातही मोटार वाहन कायद्यात आमदार लोगोवर कारवाईची तरतूद नसल्याचे महिला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी आरोप केला की, आमदाराचा लोगो पाहून आरटीओने मुद्दाम सौम्य भूमिका घेतली; ही जर सर्वसामान्यांची गाडी असती तर क्षणाचाही विलंब झाला नसता.
ही गाडी बीडमधील एका आमदाराच्या जवळील कार्यकर्त्याची असल्याची चर्चा आहे. नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित — जर ही सर्वसामान्यांची गाडी असती तर आरटीओ एवढा मवाळ राहिला असता का?
राज्यात आमदार-खासदार लोगो लावून बिनधास्त फिरणाऱ्या वाहनांचा पूर वाढला आहे, पण पोलिस-आरटीओची डोळेझाक सुरूच. कायदा सर्वांसाठी समान असावा, पण इथे लोगोची ताकद कायद्यावर मात करत असल्याचा संताप जनतेत व्यक्त होत आहे.
याबाबत आरटीओच्या वरिष्ठ अधिकारी अर्चना गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
शिरूर तालुक्यात आज पुन्हा कायद्याची हत्या झाली. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि सत्ताधारी यांच्यासाठी कायदा वेगळा असल्याचा प्रत्यय आला.” सामाजिक कार्यकर्ते... निलेश वाळुंज

शिरूर | शहरात पुन्हा एकदा ‘आमदार’ स्टिकर असलेली लाल रंगाची स्वीप्ट कार पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांच्या नाकाखाली बिनधास्त धावली. गाडीवर पुढील-मागील नंबर प्लेट नव्हत्या, त्या डिकीत ठेवलेल्या होत्या, तसेच काळ्या काचा लावलेल्या होत्या. ही गाडी तहसील कार्यालयाजवळ उभी असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी पोलिसांना कळवले. मात्र, एकाही पोलिसाने घटनास्थळी हजेरी लावली नाही.

यानंतर शिरूर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पण कारवाईसाठी अधिकारी स्वतः न जाता एका एसटी चालकाला गाडीजवळ पाठवण्यात आले. इतक्यात चालक कार घेऊन पसार झाला.

सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी विचारणा केल्यावर महिला आरटीओ अधिकाऱ्यांनी “टॅक्स नसेल तर डिटेन करण्याचे अधिकार आहेत, बाकी प्रकरण आमच्या कक्षेत नाही” असे सांगत जबाबदारी झटकली. तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “मशीनमध्ये फोटो नीट येत नाही” असा दावा करत मोबाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!