लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; ‘त्या’ महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा 16 वा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता केला जाणार आहे. मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार असल्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं.
गेल्या महिन्याभरापासून ई केवायसी करताना मोठा अडचणी येत होत्या. कधी सर्वर डाऊन, कधी ओटीपी न येणे अशा समस्यांमुळे महिला मेटाकुटीला आल्या होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरेंनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि ई केवायसीसाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होण्याच्या अपेक्षा होती मात्र गेल्या महिन्याभरापासून अनेकांना अडचणी येत होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.


काय म्हणाल्या अदिती तटकरे?
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या,” लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत. त्यामुळे वेळ लागत असल्याचं मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. अजितदादांनी 24 तासांमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. जो तो विरोधक आपली मत व्यक्त करत असतो. राजीनामा आणि इतर गोष्टींचा विषयी येत नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या. त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांचा आशीर्वादही घेतला.
ई केवायसी करण्याची मुदत काय?
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधक कडवी टीका करताना दिसत आहेत. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या योजनेमुळे राज्यातील अनेक विकास कामे करण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत. अनेक योजना रद्द करण्याची वेळ सरकारवर आली आहे असे टिका वारंवार होताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींचा 16 हप्ता जमा होण्यासाठी त्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. इ केवायसी शिवाय पुढील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशा सूचना आहेत. ई केवायसी करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे.





