Home » ब्लॉग » आरोग्यदूत ते आधुनिक श्रावणबाळ — प्रफुल्ल शिवले यांची जनमानसातील लोकप्रियता शिखरावर

आरोग्यदूत ते आधुनिक श्रावणबाळ — प्रफुल्ल शिवले यांची जनमानसातील लोकप्रियता शिखरावर

Facebook
Twitter
WhatsApp
189 Views
  • कोरोना काळात आरोग्यसेवा, मदतकार्य आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत खऱ्या अर्थाने आधुनिक श्रावणबाळ म्हणून ओळख निर्माण.
  • शेकडो भाविकांसाठी रेल्वेच्या माध्यमातून उज्जन महाकाल दर्शनाची प्रभावी व्यवस्था करत सामाजिक कार्याची नवीन पातळी गाठली.
शिक्रापूर/प्रतिनिधी
पाबळ–केंदूर गटात प्रफुल्ल शिवले हे गेल्या काही वर्षांत सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे लोकांच्या मनात भक्कमपणे रूजलेले नाव ठरले आहे. कोरोनाकाळातील धैर्यशाली सेवा आणि आता भव्य धार्मिक यात्रांचे आयोजन या दोन टोकांच्या आणि तितक्याच महत्त्वपूर्ण कार्यांनी त्यांची प्रतिमा ‘आरोग्यदूत’ ते ‘आधुनिक श्रावणबाळ’ अशी उंचावली आहे.
कोरोना महामारीने भीतीचे आणि अनिश्चिततेचे सावट निर्माण केले होते. त्या काळात अनेकजण भीतीने घरातच थांबले असताना, प्रफुल्ल शिवले मात्र रुग्णांच्या मदतीसाठी रणांगणात उतरले. त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने कोरोना सेंटर उभारले, उपचार, ऑक्सिजन, औषधे, भोजन आणि आवश्यक व्यवस्था स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. रात्री–दिवस रुग्णसेवेत झोकून देत अनेकांना जीवनाचा आधार दिला. या कठीण काळातील त्यांचा करुणाशील सेवाभाव पाहूनच त्यांना ‘आरोग्यदूत’ असे संबोधले जाऊ लागले. महामारी कमी झाली तरी त्या दिवसांची स्मृती आजही नागरिकांच्या मनात कायम आहे.
याच सेवाभावावर आधारित त्यांच्या कार्याचा दुसरा मोठा अध्याय म्हणजे उज्जैन महाकाल यात्रेचे आयोजन. शिवले यांनी आजवर पाच, सहा नव्हे तर तब्बल सात रेल्वेगाड्यांमधून हजारो भाविकांना महाकालेश्वर भस्मारतीचे दर्शन घडवले. हजारो यात्रेकरूंसाठी भोजन, निवास, आरोग्य सुविधा आणि व्यवस्थेचे उत्तम नियोजन करून त्यांनी अनुभवी संयोजक म्हणून स्वतःचा ठसा उमटवला. महिलांचा मोठा सहभाग, सर्व वयोगटातील भाविकांची सुरक्षित आणि संस्मरणीय यात्रा यामुळे ही यात्रा एक सामाजिक धार्मिक महोत्सव ठरली. या उपक्रमाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ‘आधुनिक श्रावणबाळ’ अशी ओळख मिळाली कुटुंब, समाज आणि ज्येष्ठांच्या सेवेला सर्वोच्च मान देणाऱ्या नेतृत्वाची.
प्रफुल्ल शिवले यांच्या लोकप्रियतेत भर घालणारा आणखी एक उपक्रम म्हणजे करंदी गावातील भव्य बैलगाडा शर्यत. ग्रामीण संस्कृतीचे वैशिष्ट्य जपणारा हा पारंपरिक सोहळा प्रफुल्ल शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम व्यवस्थापनासह पार पडला. हजारो नागरिक उपस्थित राहून शर्यतीचा आनंद घेत असताना, स्थानिक शेतकरी समुदायाने त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. बैलगाडा शर्यतीतून ग्रामीण परंपरा, शेतकरी सन्मान आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम घडवण्यात ते यशस्वी ठरले.कोरोनाकाळातील सेवाभाव, उज्जैन महाकाल यात्रांचे भव्य आयोजन, आणि स्थानिक परंपरांचे संवर्धन या तिन्ही गोष्टींनी प्रफुल्ल शिवले यांचे कार्य आज सर्वपक्षीय, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उभे राहिले आहे. त्यांची प्रतिमा पदापेक्षा मोठी झाल्याचे गावागावातील प्रतिसादातून स्पष्ट दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!