लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात आज जिथे जाल, तिथे एकच गजर ऐकू येतो —
“प्रदीप भाऊ कंद… तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!”
लोणिकंद/प्रतिनिधी
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक आणि सामाजिक कार्याची अभूतपूर्व लगबग सुरू आहे आणि या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी एकच नाव मोठ्या अभिमानाने उच्चारले जाते—प्रदीप भाऊ कंद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या विविध तीर्थक्षेत्र यात्रांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये अपार उत्साह पाहायला मिळतोय.
नुकतिच पिंपळे सांडस येथून भक्तांच्या गाड्यांनी श्री अनंत बाळूमामा आदमापूर येथे दर्शनासाठी प्रस्थान केले. तर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ, तसेच कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, बाळूमामा आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या पवित्र स्थळांकडे गाड्यांनी मार्गक्रमण केले.या सर्व यात्रांचे व्यवस्थापन, नियोजन आणि भाविकांच्या सुविधांचा प्रशंसनीय सांभाळ प्रदीप भाऊ कंद यांच्या मार्गदर्शनाखालीच अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यात येत आहे.
त्यामुळे या यात्रा विषयी भाविकांनी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या आहेत“भाऊ आहेत म्हणून आम्हाला ही पुण्ययात्रा अनुभवायला मिळते…”,“प्रदीप भाऊ म्हणजे विश्वासाचा आधार…”,“जिथे सेवा तिथे प्रदीप भाऊ कंद…”.
गावागावातून निघणाऱ्या यात्रांमुळे संपूर्ण गटात एकच चर्चा रंगली आहे..“सेवेच्या प्रवासाचा खरा सेवेकरी—प्रदीप भाऊ कंद!”
भाऊंनी गेली अनेक वर्षे कोणत्याही पदाचा मोह न बाळगता सामान्य नागरिक, वारकरी आणि महिलांसाठी सतत उपक्रम राबवले. देवदर्शन यात्रांचा हा वाढता ओघ त्यांच्या जनसंपर्काची, लोकांवरील प्रेमाची आणि सेवाभावाची जिवंत साक्ष ठरत आहे. भक्तांच्या गर्दीतून उमटणारा एकच स्वर आता सर्वत्र घुमतोय ,“प्रदीप भाऊ कंद – जनतेचा नेता, सेवाभावाचा चेहरा!”
लोणीकंद–पेरणे गटातून निघालेल्या या यात्रांनी एकच गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे भक्तीचा मार्ग, विकासाची वाट आणि विश्वासाचा आधार… हे सर्व प्रदीप भाऊ कंद यांच्या नेतृत्वातूनच शक्य झाले आहे!