स्व.सम्राट नाईक स्मृती पुरस्कार श्रीमती ज्योत्स्ना उर्फ शामला जोशी यांना देण्यात आला.
” एक होता सम्राट ” हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रमात , गेली ५५ वर्षे गायन कलाक्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ गायिका श्रीमती ज्योत्स्ना उर्फ शामला जोशी यांना स्व.सम्राट नाईक स्मृती पुरस्कार २०२५ हा श्रीमती जयश्रीताईं सम्राट नाईक ( ज्येष्ठ समाजसेविका ) यांच्या हस्ते वेदशास्त्रोत्तेजक सभा , पुणे येथे देण्यात आला.. हा सुंदर कार्यक्रम अपेक्षा मासिक संपादक मा. श्री. दत्तात्रेय उभे व उपसंपादक मा.श्री.संजय जगताप व अपेक्षा मासिक परिवार यांनी आयोजन केले होते. हा संगीत रजनी कार्यक्रम व पुरस्कार सोहळा अतिशय सुंदर झाला तसेच अन्य गायक -गायिका कलाकारांनी उपस्थित राहून गायन सादर केले.