Home » ब्लॉग » “ग्रामस्थांची समस्या, प्रदीप भाऊंची प्राथमिकता!”

“ग्रामस्थांची समस्या, प्रदीप भाऊंची प्राथमिकता!”

Facebook
Twitter
WhatsApp
14 Views
  • बुर्केगाव (ठोंबरे वस्ती) येथील बिरोबा मंदिराकडे जाणारा रस्ता खराब अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत होता.
  • ग्रामस्थांनी ही समस्या प्रदीप भाऊ कंद यांच्यासमोर मांडली, त्यावर भाऊंनी तातडीने स्वतः लक्ष घालून काम सुरू केले.
  • रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करून भाऊंनी ग्रामस्थांना कायमचा दिलासा दिला.
  • प्रदीप भाऊ कंदांच्या सेवाभाव आणि कार्यशैलीमुळे गावकऱ्यांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ झाला.
लोणिंकंद /प्रतिनिधी
बुर्केगाव (ठोंबरे वस्ती) येथील बिरोबा मंदिराकडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून अतिशय खराब अवस्थेत होता. दगड, खोल खड्डे, चिखल आणि उखडलेला रस्ता यामुळे ग्रामस्थांना पायी जाणेही कठीण झाले होते. शाळेतील मुलांना, महिलांना तसेच मंदिरात जाणाऱ्या भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी आपल्या नेहमीच्या आधारस्तंभासारख्या प्रदीप भाऊ कंद यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी परिस्थितीची दखल घेत विलंब न करता थेट स्वतः रस्त्याच्या कामात लक्ष घातले.प्रदीप भाऊ कंद यांनी संबंधित रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून घेतले. भाऊंनी स्वतः लक्ष घालून काम सुरू केले. अवघ्या काही वेळात रस्ता उत्कृष्टपणे तयार झाला आणि ग्रामस्थांची वर्षांपासूनची अडचण दूर झाली.
“एखादा नेता वचन देतो, पण प्रदीप भाऊ ते वचन पूर्ण करून दाखवतात. आमच्या गावासाठी, आमच्या मुलांसाठी, आमच्या देवळासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार विसरण्यासारखा नाही.”अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली 
प्रदीप भाऊ कंद हे गेल्या काही महिन्यांपासून गटातील अनेक विकासकामांसाठी ओळखले जात आहेत. वडगाव शिंदे येथील डीपी बदलण्यापासून ते तीर्थक्षेत्र यात्रांचे आयोजन, पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवणे, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई—त्यांच्या कामाचा वेग आणि लोकांसाठीची तत्परता सर्वत्र कौतुकाचा विषय बनली आहे.
“प्रदीप भाऊ कंद आहेत म्हणून आमच्या समस्या वेळेत सुटतात.”बिरोबा मंदिर रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊन प्रदीप भाऊ कंद यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की विकास हा फक्त आश्वासन नसून कृतीतून दिसणारा निर्धार असतो.
तर परिसरासह बुर्केगावमध्ये आता एकच चर्चा—
“काम पाहिजे तर प्रदीप भाऊ कंद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!