नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
पुणे : राज्याच्या अनेक भागात पारा घसरायला सुरूवात झाली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा पारा हा 6 अंशांहून कमी झाल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (Weather update) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे.
मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये कोल्ड वेवची स्थिती कायम राहणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Weather update)
पुणे शहराचे तापमान 8.1 अंशावर घसरले आहे. यंदाचा हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पुण्यात थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. शहराच्या बाकी भागात तापमान 10-12 अंशावर स्थिर आहे. मात्र पुण्यातील तापमान शिवाजी नगर 8.9 अंश सेल्सिअसवर आले आहे. पाषाणमधील तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे. (Weather update)


तर नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा मुक्काम कायम आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र मध्ये थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. निफाडचे तापमान 6.1 अंश सेल्सिअस तर नाशिकचा पारा 8.2 अंशावर गेला आहे. पुढील दोन तीन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather update)
नागपुरात आज या मोसमातील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरात आज 8.1 डिग्री सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. काल नागपुरात 8 डिग्री सेल्सिअस किमान तापमान होता, जो या मोसमातील सर्वात निचांकी तापमान होते, त्यामुळे आजचा किमान तापमान या मोसमातील दुसरा निचांकी तापमान आहे. विधिमंडळ परिसरात आपापल्या कामासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांना सकाळच्या सत्रात तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बहुतांशी लोक विधिमंडळाच्या समोरील भागात उन्हामध्ये उभे राहणं पसंत करत आहे. तर भंडाऱ्यात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस अतके आहे, तर बुलढाण्यात 12.2 अंश इतके तापमान आहे, गोंदियामध्ये आजचे तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे, तर परभणीचे तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतके आहे.
कोकणातील मिनी महाबळेश्वर गारठलं आहे. दापोलीमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअसवरती आला आहे. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण गुहागर आणि खेडमध्ये देखील प्रचंड थंडी पडली आहे. नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. अहिल्यानगरमध्ये तापमान 7.5 अंश सेल्सिअस इतके आहे.
तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, यानंतर लगेचच पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Weather Update: राज्यातील तापमानाची आकडेवारी
रत्नागिरी – १७.६संभाजीनगर – १०.८कोल्हापूर – १४.४डहाणू – १५.२सोलापूर – १३.२पुणे – ७.९ (महाबळेश्वरपेक्षाही पुण्यातील पारा कमी)बारामती – ७.५महाबळेश्वर- ११.१नाशिक – ८.२मुंबई कुलाबा – २०.९नंदुरबार – १२.४सातारा – १०सांगली – १२.३नांदेड – ८.८सांताक्रुज – १५.६उदगीर – ११अहिल्यानगर- ६.६परभणी – १०.४धाराशिव – १०.२जेऊर – ५.५मालेगाव – ८.८
Author : अंकिता खाणे






