Home » ब्लॉग » भक्ती परंपरेचा सन्मान, योगेश झुरुंगे यांच्या वतीने बिरोबा भजनी मंडळास साहित्य वाटप

भक्ती परंपरेचा सन्मान, योगेश झुरुंगे यांच्या वतीने बिरोबा भजनी मंडळास साहित्य वाटप

Facebook
Twitter
WhatsApp
50 Views

वाघोली/प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांचे नाव चर्चेत आहे. सामाजिक कार्यातून सातत्याने केलेल्या कामांमुळे मतदारांमध्ये त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषद सदस्य पदासाठी तयारी सुरू केलेल्या योगेश झुरुंगे यांच्या वतीने पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील पेरणे येथील कोळपेवाडी गावातील बिरोबा भजनी मंडळास भजनासाठी आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. कुसेगाव येथून आलेल्या भानोबा देवाच्या पालखीच्या अवचित साधून हे साहित्य सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे यांनी दिली.
कुसेगाव ते कोयाळी मार्गावरील भानोबा देवाची पालखी कोळपेवाडी येथे विसाव्यासाठी थांबते. या वेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच पालखीसोबत आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
यावेळी पेरणे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळपे, पेरणेचे माजी उपसरपंच मच्छिंद्र गुंडकर, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे तज्ज्ञ संचालक सुदाम कोळपे, सोनबा ठोंबरे, माऊली तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश कोळपे, भानूदास कोळपे, काळूराम ठोंबरे, किसन टुले, गणेश कोळपे, खंडू कोळपे, अक्षय कोळपे, चेतन ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वखर्चातून बर्केगाव परिसरातील रस्त्यांचे मुरूमकरण, विविध स्थानिक समस्यांवर प्रभावी पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे झुरुंगे यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. विकासकामांसोबतच सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहिल्याचा अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत.
पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास योगेश झुरुंगे यांनी व्यक्त केला असून येत्या निवडणुकीत या गटातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!