Home » गुन्हा » मॅडम, दुसऱ्यांशी बोलू नका, शिक्षिकेला प्रपोज अन् मैत्रिणीला वॉशरुममध्ये ‘तो’ प्रश्न, पुण्यात विद्यार्थी नव्हे, ‘विद्यार्थिनी’चे प्रताप

मॅडम, दुसऱ्यांशी बोलू नका, शिक्षिकेला प्रपोज अन् मैत्रिणीला वॉशरुममध्ये ‘तो’ प्रश्न, पुण्यात विद्यार्थी नव्हे, ‘विद्यार्थिनी’चे प्रताप

Facebook
Twitter
WhatsApp
67 Views

मॅडम, दुसऱ्यांशी बोलू नका, शिक्षिकेला प्रपोज अन् मैत्रिणीला वॉशरुममध्ये ‘तो’ प्रश्न, पुण्यात विद्यार्थी नव्हे, ‘विद्यार्थिनी’चे प्रताप

पुणे : शहरातील एका नामवंत शिक्षण संस्थेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या विचित्र वागणुकीने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आपल्याच शिक्षिकेच्या प्रेमात पडल्याचा दावा करत या अल्पवयीन मुलीने त्यांना अश्लील मेसेज पाठवणे, स्वतःला इजा करून घेणे आणि आत्महत्येची धमकी देण्यापर्यंत मजल मारल्याने शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, शाळा प्रशासन आणि दामिनी पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या प्रकरणावर शांततेत पडदा टाकण्यात आला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेच्या मोबाईलवर सतत ‘आय लव्ह यू’ असे संदेश पाठवत होती. “तुम्ही दुसऱ्या कोणाशीही बोललेले मला खपत नाही,” अशा शब्दांत तिने शिक्षिकेवर मानसिक दबाव निर्माण केला होता. शिक्षिकेने तिला अभ्यासावर लक्ष देण्यास सांगून वारंवार समजावले, परंतु तिचे वर्तन अधिकच हिंसक होत गेले.

 

तिने रागाच्या भरात ब्लेडने स्वतःच्या हातावर शिक्षिकेचे नाव कोरले आणि जर शिक्षिकेने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, तर शाळेच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवण्याची धमकी दिली.

 

या विद्यार्थिनीच्या वर्तणुकीचा त्रास केवळ शिक्षिकेलाच नाही, तर तिच्या वर्गमैत्रिणींनाही सहन करावा लागत होता. तिने वर्गातील काही मुलींना प्रेमाचे संदेश पाठवून त्यांच्या बोटात अंगठी घालण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, एका विद्यार्थिनीला वॉशरूममध्ये गाठून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणा करत तिला घाबरवून सोडले. वर्गात लक्ष न देता शिक्षिकेला एकटक पाहत राहणे आणि तासन् तास कॉरिडॉरमध्ये फिरणे, अशा तिच्या वागण्यामुळे तक्रारींचे सत्र वाढले होते.

 

पुण्यातील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शाळा प्रशासनाने तातडीने दामिनी मार्शलच्या पथकाला पाचारण केले. पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कठोर कारवाई न करता अत्यंत संवेदनशीलतेने या मुलीला हाताळले. तज्ज्ञांच्या मदतीने तिचे मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यात आले.

 

पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात निर्माण होणारे आकर्षण आणि भावनिक गोंधळ यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. योग्य वेळी तिला विश्वासात घेऊन समजावल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असून, पालकांनीही आपल्या मुलांच्या बदलत्या वागणुकीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!