Home » राजकारण » “पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी.”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

“पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी.”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

Facebook
Twitter
WhatsApp
10 Views

“पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी.”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

 

विधानसभा, नगर पालिका अन् आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजयी असल्याचे सिद्ध केले. भाजपाने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजपा-शिंदेसेना युतीने वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये मनसेतून उद्धवसेनेत गेलेल्या वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाचाही समावेश होता. पुणे मनपा निवडणुकीनंतर आता वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या.

पुणे मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक दिग्गजांमध्ये वसंत मोरे यांचाही समावेश आहे. मनसेमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे हे पुण्याच्या प्रभाग क्रमांक ३८ मधून निवडणुकीच्या मैदानात होते. भाजपाच्या संदीप बेलदरे यांनी वसंत मोरे यांचा पराभव केला. वसंत मोरेंसह त्यांचा मुलगा उद्धवसेनेतून निवडणूक लढवत होते. दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. फायरब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरेंना अशाप्रकारे पराभव पत्करावा लागल्यामुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली.

पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?

वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. यात वसंत मोरे म्हणतात की, पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले? याला कारण २०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल…या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले… हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले… आबा बागुल माजी विरोधी पक्षनेता, दत्तात्रय धनकवडे माजी महापौर, सुभाष जगताप माजी सभागृहनेता, विशाल तांबे माजी स्थायी समिती चेअरमन, अश्विनी कदम माजी स्थायी समिती चेअरमन, वसंत मोरे माजी विरोधी पक्षनेता गटनेता, संजय भोसले माजी गटनेता, दिपाली धुमाळ माजी विरोधी पक्षनेता, साईनाथ बाबर माजी गटनेता, अशोक हरणावळ माजी गटनेता, शंकर केमसे माजी सभागृहनेता, किशोर शिंदे माजी गटनेता, बाबू वागसकर माजी गटनेता, अविनाश बागवे स्थायी समिती सभासद, नंदाताई लोणकर स्थायी समिती सभासद, योगेश ससाने स्थायी समिती सभासद, नाना भानगिरे स्थायी समिती सभासद, रूपाली पाटील शहर सुधारणा अध्यक्ष हे सर्वजण जर सभागृहात असते तर यांच्या चार वर्षाच्या पापाचा पाढा सतत बाहेर काढला असता…, असे वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पुणे मनपा निकालानंतर जवळपास आठवड्याभराने वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून त्यामधून त्यांनी अनेक आरोप केले आहेत. पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र केल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!