Home » देश आणि परदेशात » मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं ‘अर्थ’ कारण

मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं ‘अर्थ’ कारण

Facebook
Twitter
WhatsApp
14 Views

मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं ‘अर्थ’ कारण

 

“तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो, मुद्दामहून सांगतो. जसे एक टुलकिट चालले की, मंगलप्रभात लोढांच्या सुपुत्राने दावोसला येऊन करार का केला? खरं म्हणजे अभिषेक लोढा हे अतिशय देशातील प्रतिथयश उद्योगपती आहेत.

 

ते फक्त मंगलप्रभात लोढांचे सुपुत्र नाहीत. तर जो त्यांनी करार केला आहे. त्या करारामुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे. हे काही त्याठिकाणी लोढांची संपत्ती तयार करत नाहीत”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा समूहासोबत दावोसला झालेल्या कराराबद्दल उत्तर दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी भारतातील उद्योग आणि जगातील अर्थकारण यांचा संबंध सांगत दावोसमधील करारांचा मुद्दा स्पष्ट केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जमीन त्यांची आहे. व्यवस्था ते करत आहेत. या ठिकाणी जगातील चार, सगळ्यात महत्त्वाच्या कंपन्या डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करत आहेत. हायपरस्केलर, एआय डेटा सेंटर, ज्या गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता आपल्याला आहे. ज्यामुळे मुंबई डेटा सेंटर इकोसिस्टीममध्ये पहिल्या क्रमांकावर येणार आहे. त्याचा तो करार आहे.”

त्यांचे भांडवल फक्त २० टक्के

“या सगळ्या कंपन्या एफडीआय त्या ठिकाणी आणणार आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो करार झाला आहे, यात ८० टक्के एफडीआय आहे. फक्त २० टक्के जो काही फक्त जमिनीच्या स्वरुपात त्याचे भांडवल आहे. आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, भारतीय कंपन्या या ग्लोबल झाल्या आहेत. त्या लोकल कंपन्या नाहीत”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“ज्या काही भारतीय कंपन्या आहेत. त्या आपला विस्तार करण्यासाठी आणि परकीय भांडवलासाठी या ठिकाणी येतात. ते परकीय भांडवल त्यांना मिळते. देशातंर्गत भांडवल जे काही आहे, त्यापेक्षा स्वस्त परकीय भांडवल असते. परकीय कंपन्या ज्या आहेत, त्यांनाही विस्तार करायला मिळतो. त्यामुळे ते स्थानिक भागीदार घेतात आणि अशा पद्धतीने भागीदारी याठिकाणी होते. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय कंपन्या परकीय गुंतवणूकदारांसोबत करार करत आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

‘ज्यांना अर्थव्यवस्थेशी देणं-घेणं नाही, ते लोक…’

“अनेक कंपन्या अशा आहेत की, ज्यांनी तंत्रज्ञान स्वतः तयार केले आहे आणि गुंतवणूक बाहेरून घेत आहेत. काही कंपन्या अशा आहेत की ज्या तंत्रज्ञान आणि गुंतवणूक दोन्ही बाहेरून घेत आहेत. परकीय कंपन्यांसाठी ते भारतात सेटअप करत आहेत”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

“मला असं वाटतं की, ज्यांना अर्थव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही. ज्यांना याचा तिहेरी परिणाम काय आहे, हे समजत नाही. असे अनेक लोक टीका करतात. काही लोकांना कदाचित खरंच समजत नसेल म्हणून टीका करतात. पण, एक गोष्ट निश्चित आहे की, यावर पेड टीका झाली. पैसे देऊन टुलकिट तयार करून यावर टीका झाली. त्याची नोंद मी घेतली आहे. पण, हीच टीका मागच्या वर्षीही केली होती. त्या सगळ्यांना ७५ टक्के गुंतवणूक आम्ही यशस्वी करून दाखवली”, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!