Home » गुन्हा » फिरायला जायचं म्हणत OYO मध्ये नेलं, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं; कारण आलं समोर…

फिरायला जायचं म्हणत OYO मध्ये नेलं, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं; कारण आलं समोर…

Facebook
Twitter
WhatsApp
62 Views

फिरायला जायचं म्हणत OYO मध्ये नेलं, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं; कारण आलं समोर…

 

OYO हॉटेलमध्ये नेऊन प्रेयसीची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयाच्या भोवऱ्यातून तिची हत्या झाल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात ही घटना घडली असून या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आरोपी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका राजेश भांगे (वय 21) असं मृतक तरुणीचं नाव आहे. तर सौरभ शिवदास जामगडे (वय 26 ) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी सौरभ फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो आहे.

रुचिका पोलीस भरतीची तयारी करत होती. दररोज ती पोलीस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती. यावेळी तिचे काही इतर मित्रही त्या ठिकाणी येत होते. त्यावेळी तरुणांसोबत व्यायाम करत असल्याने सौरभच्या मनात संशय निर्माण झाला. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. रुचिकाने अनेकदा याबाबत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौरभ ऐकायला तयार नव्हता.

अशातच सौरभने रुचिकाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने OYO हॉटेलमध्ये नेले. यावेळी हॉटेलमध्ये त्याच मुद्द्यावरून पुन्हा त्याच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात सौरभने धारधार शस्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार केला. यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आरोपी सौरभ तिथून पळून गेला.

दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार करण्यात आली असून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी सौरभ फरार असून त्याच्या शोध घेतला जात आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असून पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!