Home » ताज्या बातम्या » अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेची गलिच्छ टीका, ठाकरेंच्या रणरागिणीही भडकल्या, किशोरी पेडणेकरांनी…

अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेची गलिच्छ टीका, ठाकरेंच्या रणरागिणीही भडकल्या, किशोरी पेडणेकरांनी…

Facebook
Twitter
WhatsApp
83 Views

अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेची गलिच्छ टीका, ठाकरेंच्या रणरागिणीही भडकल्या, किशोरी पेडणेकरांनी…

सौजन्य -मटा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी गायिका अंजली भारती हिने अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महिला आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

“सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या पत्नी अमृता फडणवीस जी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्या वक्तव्यांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करते” अशी पोस्ट किशोरी पेडणेकर यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवर केली आहे.

 

बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना गायिका अंजली भारती हिने अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.

संजय निरुपम यांच्याकडूनही निषेध

‘लज्जास्पद विधान! ही महिला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्काराची वकिली करत आहे. माता आणि बहिणींवरील अत्याचाराला विरोध केला पाहिजे, पण अशा प्रकारे नाही. निषेध! निषेध! निषेध!’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही अंजली भारती हिच्यावर टीका केली आहे.

चित्रा वाघही संतापल्या

“श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे?

हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भीम

कोण आहे अंजली भारती?

अंजली भारती ही बौद्ध अनुयायी विद्रोही गायिका म्हणून ओळखली जाते. दीदी अंजली भारती या नावाने तिचे यूट्यूब चॅनेल आहे. त्यावर जवळपास पावणेसहा लाखांच्या आसपास सबस्क्राईबर्स आहेत. तर दीड हजारांच्या घरात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तिने अनेक गाणी गायलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!