Home » ताज्या बातम्या » आता प्रवास होणार अधिक आरामदायी! पुणे ते बोरीवली धावणार ई-शिवाई बस; जाणून घ्या वेळापत्रक आणि मार्ग

आता प्रवास होणार अधिक आरामदायी! पुणे ते बोरीवली धावणार ई-शिवाई बस; जाणून घ्या वेळापत्रक आणि मार्ग

Facebook
Twitter
WhatsApp
89 Views

आता प्रवास होणार अधिक आरामदायी! पुणे ते बोरीवली धावणार ई-शिवाई बस; जाणून घ्या वेळापत्रक आणि मार्ग

 

पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे स्टेशन ते बोरीवली (सायन मार्गे) धावणारी ई-शिवाई वातानुकूलित बस सेवा आता अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

 

या सेवेचा लाभ पुणे, चिंचवड आणि मुंबईदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

शिवाजीनगर आगारातून ई-शिवाई सेवेची सुरुवात

एमएसआरटीसीकडून सुरू करण्यात आलेली ही नवी ई-शिवाई बस सेवा शिवाजीनगर आगारातून धावणार आहे. ही बस पुणे स्टेशन, चिंचवड आणि सायन मार्गे बोरीवली येथे पोहोचणार असून, प्रवाशांना शहरातील गर्दी टाळत सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचा उद्देश आहे.

पुणे-बोरीवली ई-शिवाई बसचे वेळापत्रक

या मार्गावर दररोज खालील वेळेत बस फेऱ्या असणार आहेत.

सकाळी: 6.00, 7.00, 8.00 आणि 9.00

दुपारी: 1.00, 2.00 आणि 3.00

सायंकाळी: 4.00

एमएसआरटीसीनुसार, पुणे-चिंचवड-बोरीवली मार्गावर मोठ्या प्रमाणात कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी असल्याने ही सेवा त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

तिकीट आरक्षणाची सुविधा

प्रवाशांना तिकीट आरक्षण सोप्या पद्धतीने करता यावे यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पुणे स्टेशन बसस्थानक

वल्लभनगर

चिंचवड स्टेशन

निगडी

याशिवाय प्रवासी MSRTC मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनही ऑनलाइन तिकीट आरक्षित करू शकतात.

सुरक्षित, वातानुकूलित आणि वेळ वाचवणारी सेवा

ई-शिवाई वातानुकूलित बस सेवा ही आरामदायी, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी असल्याचे एमएसआरटीसीने स्पष्ट केले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!