आयुष्मान भारत कार्ड वर्षभरात किती वेळा वापरता येतं? वाचा नियम काय सांगतो
केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना
५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार
वर्षभरात किती वेळा घेता येणार लाभ?
केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे आयुष्मान भारत.
आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मदत केली जाते. या योजनेत गरीब कुटुंबातील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. देशातील लाखो नागरिक या योजनेचा लाभ घेत आहे.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे. आयुष्मान कार्ड असेल तरच तुम्हाला उपचार घेता येणार आहे. दरम्यान, या योजनेत वर्षभरात कितीवेळा उपचार घेता येतात असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबतचे नियम जाणून घ्या.
वर्षभरात किती वेळा घेऊ शकतात उपचार? (How many times you get benefit of ayushman bharat in 1 year)
आयुष्मान भारत योजनेत उपचारासाठी पैसे मिळतात. यासाठी नागरिक अॅडमिट झाल्यानंतर त्याला कार्ड दाखवायचे आहे. दरम्यान, वर्षभरात तुम्ही कितीही वेळा उपचार घेऊ शकतात. या योजनेत उपचार घेण्यासाठी कोणतीही लिमिट नाहीये. या योजनेत संपूर्ण कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचे उपचार मिळतात.
जर कुटुंबात ४-५ लोक असतील तर त्यांच्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. यासाठी तुम्हाला अॅडमिट व्हायचे आहे. यानंतर ही प्रोसेस सुरु होईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
आयुष्मान कार्ड हे अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हा उपचार घेणार आहात ते रजिस्टर असणे गरजेचे आहे. या योजनेच्या माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊ शकतात. या योजनेत आयुष्मान कार्डसाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
या हॉस्पिटलमध्ये करता येतात उपचार
आयुष्मान कार्डअंतर्गत सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करता येतात. तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात याची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल. तुम्ही PMJAY वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर Find Hospital वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला हॉस्पिटलची संपूर्ण लिस्ट मिळेल.






