Home » ताज्या बातम्या » अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, गडकरींसह अनेकांनी केल्या भावना व्यक्त

अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, गडकरींसह अनेकांनी केल्या भावना व्यक्त

Facebook
Twitter
WhatsApp
75 Views

अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, गडकरींसह अनेकांनी केल्या भावना व्यक्त

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, तर नितीन गडकरी यांनी एक जवळचा मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, “अजित पवार जी हे जनतेचे नेते होते, ज्यांचा तळागाळातील लोकांशी घनिष्ठ संबंध होता. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात अग्रेसर असलेले एक मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचित लोकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळ उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती.”

नितीन गडकरी यांनी व्यक्त केला शोक: “महाराष्ट्राच्या विकासाचा आधारवड हरपला”

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, “अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातामुळे मी व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या गहन दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य मिळो, अशी प्रार्थना करतो.”

राज्यात दुखवटा

सुत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात राजकीय दुखवटा जाहीर केला असून, सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बारामतीमध्ये आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून संपूर्ण शहर आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले आहे.

दादांची आदरयुक्त भिती वाटायची – संजय शिरसाट

अजित पवारांच्या निधनानंतर शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट अजित पवार आदरयुक्त भिती वाटायची, दादांना भेट हवी हे म्हटल्यानंतर ते सकाळी साडेसहाला येतो का असे म्हणायचे एवढे ते काम करणारे होते. सकाळी सहाला पीएचा फोन यायचा व दादा वाट पाहत आहेत हे सांगायचे. शिस्तीचे नेते असले तरीही ते मनाने हळवे होते. संकटाचा सामना दादांनी स्वःत केला. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पुरुन उरायचे, दादांचे बोलणे, वागणे, भाषण हे डोळ्यासमोर आणले तर दादा गेले यावर विश्वास बसत नाही. दरारा होता पण त्यांच्याबद्दल लोकांना आदर खूप वाटायचा.

चांगल्या प्रशासकाला महाराष्ट्र मुकला!- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, अजित पवार चांगले प्रशासक असून त्यांच्या जाण्याने नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात बसला कुटुंबांना माझे ते जुने सहकारी होते, त्यांचे माझे अतिशय घनिष्ठ संबंध होते.

मृदू हृदयाचे दादा – उज्ज्वल निकम

प्रख्यात विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, माझा अपघात घडला तेव्हा गंभीर दुखापत झाली. तेव्हा दादाने माझी आस्थेवाईक चौकशी केली होती. मृदू हृदयाचे दादा होते. चांगला प्रशासक कर्तबगार उपमुख्यमंत्र्याला मुकला, पत्नी सुनेत्रा पवार या शांत सुस्वभावी आहेत. राज्यसभेत त्या आणि माझे आसन जवळ असायचे आज दादा गेले ते खऱ्या अर्थाने सर्वांचे दादा होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!